शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या दरात असा दुजाभाव का? वसमत मोंढा अन् नांदेडच्या भावात ७ हजारांचे अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:36 IST

नांदेडच्या बाजारात आजपर्यंतचा सर्वोच्च २७,५०० रुपये भाव

- रामेश्वर काकडेनांदेड गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दराने तेजी घेतली असून हळदीला सोन्याची झळाळी आली आहे. परंतु नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने खरेदीदाराकडून असा दुजाभाव का असा प्रश्न विचारला जात आहे. 

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गुरुवार १० ऑगस्ट रोजी आजपर्यंतचा सर्वोच्च २७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे. हा दर मागील काही वर्षांतील सर्वोच्च असल्याचे शेतकरी सांगत आहेत. असे असले तरी शेजारील जिल्हा असलेल्या हिंगोलीतील वसमत मार्केट यार्डामध्ये नांदेडपेक्षा जादा दराने हळदीची खरेदी करण्यात येत आहे. वसमतनगर बाजारात गुरुवारी झालेल्या जाहीर लिलावात हळदीला सर्वोच्च ३५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

या दरवाढीचा बहुतांश मोठ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत असल्याचे दिसून येते. असे असले तरी नांदेडपासून केवळ २५ किमी अंतरावर असलेल्या वसमत बाजारपेठेत नांदेडपेक्षा सात ते साडेसात हजार रुपये जादा दर मिळत आहे. त्यामुळे दोन्ही मार्केटमधील दरामध्ये एवढी तफावत कशामुळे अशी चर्चाही नांदेडच्या मार्केट यार्डात ऐकावयास मिळत आहे. सध्या हळदीच्या दरात मोठी तेजी असली तरी त्याचा लाभ बहुतांश साठेबाजी केलेल्या बड्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांनाच मिळत आहे. 

गेल्या चार वर्षांपासून हळदीला सातत्याने कमी दर मिळाल्याने हळद उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला होता. मान्सूनने महिनाभर उशिरा आल्याने पेरण्या तब्बल दीड महिना उशिराने झाल्या. त्याचा परिणाम उत्पन्न कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भविष्यात हळदीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे हळदीचे ॲडव्हान्स सौदे झाल्याने बाजारात तेजी कायम असल्याचे चित्र आहे.

तेजी कायम सध्या बाजारात हळदीला विक्रमी तेजी आली असून हळदीने ३० हजार रुपयांचा उच्चांक गाठला आहे़. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हळदीतील तेजी कायम असल्याने कमोडिटी वायदे बाजार हा पोषक ठरला आहे़.- प्रल्हाद इंगोले कृषी अभ्यासक

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी