शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पोहताना कंबरेला बांधलेला डबा निसटला अन् युवकाचा बुडून मृत्यू 

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 18, 2023 13:21 IST

अचानक पाठीवर बांधलेला डब्बा निसटला अन् युवक 40 फुट खोल विहीरीच्या तळाला गेला

- शेखर पाटीलमुखेड : पोहणे शिकण्यासाठी विहिरीत उतरलेल्या युवकाच्या कंबरेचा डबा निसटला आणि ४० फूट खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील सकनूर येथे घडली आहे. देविदास अशोकराव हंबीरे (१७) असे मयत युवकाचे नाव आहे.

सकनूर येथील रहिवासी आणि बाराहाळी येथील विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या देविदास हंबीरे याला पोहता येत नव्हते. पोहणे शिकण्याच्या उद्देशाने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास देविदास हा गावाजवळील शेतातील विहिरीवर गेला. पाठीवर डबा बांधून तो विहिरीमध्ये उतरला;  मात्र अचानक पाठीवर बांधलेला डब्बा निसटला आणि देविदास ४० फूट खोल पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर लगेच विहिरीत शोध कार्य सुरू करण्यात आले. जीवरक्षक दलाच्या मदतीने चार तास प्रयत्न करून मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. सायंकाळी देविदास हंबीरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तलाठ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

देविदास अकरावी वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील कापड दुकानात मुनीम म्हणून काम करतात. या घटनेने हंबीरे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. मयत देविदास हंबीरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू