शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ऑफरमध्ये घेतलेल्या मोबाईवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याचा हात गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 21:19 IST

मुखेड तालुक्यातील  कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्यांने टि.व्ही. वरील मोबाईलची जाहीरात पाहून मोबाईल ऑनलाइन मागणी केली.

नांदेड- ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलाला हात गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात हा प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुखेड तालुक्यातील  कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्यांने टि.व्ही. वरील मोबाईलची जाहीरात पाहून मोबाईल ऑनलाइन मागणी केली, जाहीरातीमध्ये १५००/ -रुपयाला तीन मोबाईल त्यावर एक घडयाळ मोफत असल्याची आय कॉल के ७२ (I KALL k72) या कंपनीची जाहीरात पाहून मोबाईलची मागणी केली, त्या तीन मोबाईल पैकी एक मोबाईल गेल्या एक ते दिड महिन्यांपासुन वापरात होता. त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत श्रीपत जाधव (८) वर्ष हा  नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला असता, अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात ज्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरश: उडून पडली. तर तळहात छिन्नविछिन्न झाला आहे. मोबाईलचे तुकडे छातीता, पोटाला लागुन तेथेही दुखापत झाली आहे. या स्फोटात दैव बल्लवत्तर म्हणून हातावरच वेळ निभाऊन गेली, पण हात कायमचा निकामी झाला. त्या मुलावर बाऱ्हाळी येथील डॉ. प्रविण गव्हाणे यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर उदगीर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयावर मोठा आर्थिक व मानसिक बोजा पडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोबाईलपासून एका तांड्यावरील शेतकरी कुटुंबातील मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे. या घटनेनंतर बाऱ्हाळी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलBlastस्फोट