शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: June 13, 2024 18:46 IST

चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागणार ज्ञानार्जनाचे धडे

नांदेड : शाळा सुरू होण्याला दोन ते तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्यापही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळेच्या इमारती असून वर्गखोल्याही मोडकळीस आलेल्या आहेत. परंतु, असे असताना अजूनही दुरुस्तीसाठी शासनाकडून शाळांना निधी प्राप्त झालेला नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण २ हजार १९५ जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या आहे. त्यामध्ये ७० शाळा माध्यमिक आहेत. एकूण शाळांमध्ये जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, अशी प्राथमिक मागणी असते. परंतु, अनेक शाळांच्या इमारती जुन्या असून, वर्गखोल्याही जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे म्हणजे जीव धोक्यात घालून बसावे लागते. यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते. परंतु, शासनाकडून मिळणारा निधी वेळेवर येत नसल्याने शाळा दुरुस्ती शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी होत नाही. त्यामुळे छत गळक्या, मोडकळीस आलेल्या शाळांतच जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.

२२५ शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्तावजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल २२५ शाळांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे शाळा दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. पण, शैक्षणिक सत्र सुरू होत असले तरी अद्याप शाळांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही.

जिल्ह्यात ३४६ नवीन वर्गखोल्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर

जिल्ह्यात ३४६ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु, अजूनही नवीन वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोल्या कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

नवीन वर्गखोलीसाठी ११.५० लाखांची तरतूदजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन वर्गखोली बांधकामासाठी शासनाकडून प्रति वर्गखोली ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तर वर्गखोली दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली जाते. शाळांची दुरुस्ती शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप निधीच मंजूर झाला नसल्याने नवीन वर्गखोल्या आणि दुरुस्ती कधी होणार हा प्रश्न आहे.

टॅग्स :Nandedनांदेडzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण