शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कधी संपणार व्यथा वडार समाजाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:11 IST

विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़

कुरुळा : विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़सध्या सगळीकडे सूर्य आग ओकत आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे़ ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. उष्माघाताने शेकडो लोक आपला जीव गमावत आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक कुलर, एसी लावून बसत आहेत़ मात्र वडार समाजाच्या बांधवांना मात्र टीचभर पोटाच्या खळगीसाठी ना उष्णतेचा विचार ना उष्माघात़ कारण रोज खडी फोडल्याशिवाय रात्रीची रोजीरोटी मिळत नाही़ म्हणून अशा उष्णतेच्या लाटेतसुद्धा त्यांना काम करावे लागत आहे.कुरूळा ते नंदनशिवनी रस्त्याचे काम सुरु असून त्या ठिकाणी हे वडारबांधव भर उन्हात खडी फोडत आहेत. कोण त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल? ना शासन ना मिळते रेशन, सामाजिक बांधिलकीतून खरंच या समाजाच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. त्यांंच्या या व्यथा कुठेतरी थांबल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. एकूणच वडार समाजाची अजूनही अधोगती होत असल्याचे चित्र उपरोक्त प्रकारावरून दिसून येते़ शासनस्तरावर याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़

दहाव्या वर्षांपासून काममी १० वर्षांचा होतो तेव्हापासून हा व्यवसाय करत आहे़ माझी बायको सावित्री हीसुद्धा खडी फोडण्याचे काम करते़ आम्हाला शेतीबिती नाही. यावरच आमची रोजीरोटी आहे. यावर्षीचा कडक उन्हाळा आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघितला़ हाताला कपडा बांधून काम करावे लागते- किशन खोबराजी मंजीलवाड, (रा़ मौजे खुड्याचीवाडी, ता. कंधार, जि.नांदेड)

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक