शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:47 IST

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ...

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाईलोहा तालुक्यातील दरोड्याचा यशस्वी तपास

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ठिकाणच्या दरोड्याची कबुली दिली आहे़१४ जून २०१८ रोजी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास माळाकोळी येथील नागनाथ शिवाजी बुळगुंडे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता़ यावेळी दरोडेखोरांनी नागनाथ बुळगुंडे यांची आई आणि बहिणीजवळील मंगळसूत्र, कर्णफुले व दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ सदरील दरोडा हा परभणी येथील एका आरोपीने टाकल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ त्यानंतर खबºयाकडून माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी येथील रोशनसिंग जुन्नी याला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच नाशिक जिल्ह्यात येवला हद्दीतही दरोडा टाकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली़जुन्नी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध परभणी, बाळापुर स्थित असलेल्या मोठ्या तलावातील काळी माती तेलंगणातील वाढवणा व येळवत शिवारातील काही वीट कारखानदार चोरट्या मार्गाने रात्रीला घेऊन जात जालना आणि नांदेड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत़ पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, पोकॉ़ ब्रह्मा लामतुरे, शेख जावेद, शेख अलीम, व्यंकट गंगूलवार, शंकर केंद्रे यांनी ही कारवाई केली़दरम्यान, या आरोपीकडून जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी दरोडे टाकलेत का, हेही उघड होणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसRobberyदरोडा