शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागल्यावरच विहिरीची खोदाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:17 IST

ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान पाहता देगलूर, मुखेडसह इतर तालुक्यात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. त्यापूर्वीच पाणी पुरवठ्याची कामे मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देग्रामीण पाणी पुरवठा : कोट्यवधीचा निधी उपलब्ध, योजनांना अपेक्षित गती मिळेना

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान पाहता देगलूर, मुखेडसह इतर तालुक्यात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. त्यापूर्वीच पाणी पुरवठ्याची कामे मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात सप्टेंबर अखेर ८१ टक्के पाऊस नोंदविला असला तरी देगलूरसह मुखेड, नायगाव, धर्माबाद आदी तालुक्यात पर्जन्यमान कमी झालेले आहे. देगलूर तालुक्यात तर अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. अशी स्थिती मुखेडचीही आहे. येथे सरासरीच्या निम्मा पाऊस झालेला असल्याने येणाऱ्या काळात या दोन्ही तालुक्यांसह बिलोली, धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा जाणवू शकतात. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसह राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाला गती देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वर्धीतवेग कार्यक्रमाद्वारे नळाद्वारे पाणी पुरवठ्याच्या योजना याबरोबरच ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात. सद्य:स्थितीत यातील ८८ कामे प्रगतीपथावर असून उर्वरीत ४८ कामे लवकरच मार्गी लागतील, असे पाणी पुरवठा विभागातर्फे सांगितले जात आहे. या योजनांसाठी २०१७-१८ चा अखर्चित निधी ११ कोटी ६० लाख ७२ हजार इतका उपलब्ध आहे. याबरोबरच २०१८-१९ या वर्षासाठीचे १५ कोटी ५६ लाख २७ हजार मंजूर नियतव्यय आहे. सद्य:स्थितीत या विभागाकडे अखर्चित असलेला निधी उपलब््नध आहे. मात्र त्यातील ४ कोटी ११ लाख ४१ हजाराचा प्रत्यक्ष खर्च झाला असून अद्यापही या विभागाकडे ७ कोेटी ४९ लाख ३१ हजाराचा निधी शिल्लक आहे. या निधीतून पाणी पुरवठा विभागाने उर्वरीत कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून हातपंप, विद्युत पंप, देखभाल दुरुस्तीसह विंधन विहिरी तसेच कुपनलिकेवर विद्युत पंप बसविण्याची कामे सुरू आहेत. यातून ४० कामे पूर्ण होतील, असा विश्वास पाणी पुरवठा विभागाला वाटतो. तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ३० लाखांचे मंजूर नियतव्यय आहे. यातून ६० कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने निश्चित केले आहे. संभाव्य टंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून येणाºया उन्हाळ्याची वाट न पाहता उपलब्ध निधीतून हातावर असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.देखभाल दुरुस्तीवर द्यावा लागणार भरग्रामपंचायत प्रोत्साहनपर अनुदानातून घेतलेल्या विशेष दुरुस्तीसाठी सद्य:स्थितीत १ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध आहे तर प्रादेशिक नळ योजना देखभाल व दुरुस्तीसाठीही २० लाख रुपये या विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच हातपंप व विद्युत पंप दुरुस्ती पथकासाठी २ लाख, नळयोजनांच्या विद्युत मोटार दुरुस्ती व सुटेभाग खरेदीसाठी १५ लाख आणि जिल्हा परिषद उपकर योजनेतून अंतर्गत नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी ७० लाखाचा निधी या विभागाकडे आहे. वरील सर्व निधी सद्य:स्थितीत शिल्लक असल्याने दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यायला हवी. एकूणच पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती विशेष निधी म्हणून ७ कोटी ३४ लाख रुपये उपलब्ध आहेत. यातील केवळ १ कोटी ३१ लाख ७४ हजार देखभाल दुरुस्तीसाठी खर्च झालेले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाई