शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली तालुक्यात तीव्र पाणीटंचाई सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:45 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट ‘एप्रिल हिट’ने नागरिक बेजार तापमानवाढीने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न

बिलोली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या, मेंढ्या तसेच दूध उत्पादकांना फटका बसत आहे. गुरांसह बकऱ्यांच्या चा-याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल हिटने नागरिक पुरते बेजार झाले आहेत. तापमानवाढीमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेलीपालन, पशुपालनावर चालतात. शेलीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मुख्यालयी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पाणीटंचाईमुळे इतर तालुक्यातीलही मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणचे तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.पाण्यासाठी नागरिकांचीही पायपीट पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘एप्रिल हिट’ ने नागरिक पुरते बेजार झाल्याचे दिसून येत आहे. आतापासून मे महिन्यातील तापमानाची शक्यता नागरिक वर्तवित आहेत. त्यामुळे पुढे आणखी परिस्थिती बिघडणार, अशी शक्यता आहे.अघोषित भारनियमनउन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी नागरिक घरोघरी गारवा मिळविण्यासाठी कुलर लावतात. मात्र, गरज असताना बत्ती गुल होत आहे. रात्रीही पहाटे वीज खंडित होते. अघोषित भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील हिंगणी येथील नागरिकांना पाणी असूनही मिळेनासे झाले आहे. येथील हनुमान मंदिरालगत असलेली पाण्याची मोटार एका महिन्यात तीन वेळा नादुरुस्त झाल्याने गत बारा दिवसांपर्वीपासून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मात्र याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. आता लोकसभा निवडणुका संपल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई