शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी चुनाल नाल्यावर होणार मलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:51 IST

पर्यावरण विभागाकडून १७ कोटी ५९ लाखांचा निधी

ठळक मुद्देमहापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत चुनालनाला येथे मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून या कामासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर केले आहेत. यात महापालिकेचा २० टक्के रक्कमेचा वाटा राहणार आहे.

ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाबाबत गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. महापालिकेने गोदावरी प्रदुषण रोखण्यासाठी १२ वर्षापूर्वी योजना आखली होती. शहरातून वाहणारे १९ नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता हे पाणी पाईपलाईनद्वारे देगलूरनाका येथे आणि पुढे बोंढार येथे मलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत नेण्यात आले होते. या योजनेतील अनेक त्रुटीमुळे ही योजना निश्चितच उपयुक्त ठरली नाही. परिणामी आजही गोदावरी नदीचे प्रदुषण कायम होत आहे.  याबाबत अनेक संघटना, राजकीय पक्ष संताप व्यक्त करीत आहेत. 

त्यातच नांदेडचे पालकमंत्री पद राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आल्यामुळे या गोदावरी प्रदुषणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पालकमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर गोदावरीचे झालेले एकूण प्रदुषण पाहता पर्यावरण विभागाने तत्कालीन महापौर आणि आयुक्तावरही गुन्हे दाखल केले आहेत. पुढे गोदावरी शुद्धीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला. प्रारंभी या आराखड्याला राज्यशासनाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे तो नव्याने तयार करण्यात आला होता. पालकमंत्री कदम यांनी लक्ष दिल्यानंतर नांदेड महापालिकेला थेट राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत १७ कोटी ५९ लाख ८१ हजार रुपये मंजूर करण्यात आला. या निधीतून आता महापालिका चुनालनाला येथे मलशुद्धीकरण केंद्र उभारणार आहे. या मलशुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील नाल्यांचे पाणी थेट गोदावरीत न जाता ते पाणी शुद्ध  केले जाणार आहे. 

या कामाच्या निविदा मनपाच्या मलनिसारण विभागाने मागवल्या आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत निविदा भरता येणार असून १० आॅक्टोबर रोजी निविदा संदर्भात पूर्व बैठक होणार आहे तर ही निविदा २२ आॅक्टोबर रोजी उघडल्या जातील, अशीही महापालिकेने स्पष्ट केले आहे. धार्मिकदृष्ट्या महत्व असलेल्या गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम निविदा प्रक्रियेनंतर २४ महिन्यात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणgodavariगोदावरीpollutionप्रदूषण