शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात पाणी पोहोचले; ‘बाभळी’चे वाळवंट झाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:55 IST

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडून ०़५६ टीएमसी (१५़८१ दशलक्ष घनमीटर) पाणी १ जुलै रोजी तेलंगणात सोडण्यात आले.

ठळक मुद्देराज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- लक्ष्मण तुरेराव

धर्माबाद (नांदेड ) :  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडून ०़५६ टीएमसी (१५़८१ दशलक्ष घनमीटर) पाणी १ जुलै रोजी तेलंगणात सोडण्यात आले. पाणी सोडल्याने बाभळी बंधाऱ्याचे अक्षरश:  वाळवंट झाले असून बंधाऱ्याचे दरवाजे बंद व उघडण्यासाठीच्या तारखा बदलून घेण्यासाठी राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

१ जुलै रोजी बंधाऱ्यात उपलब्ध ०़५६ टीएमसी (१५़८१ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा ऐन पावसाळ्यात तेलंगणात सोडल्यामुळे काठोकाठ भरलेला बंधारा अक्षरश: कोरडाठाक पडला असून वाळवंट  झाले आहे. पाणी सोडल्यामुळे परिसरातील  कुंडलवाडी, धर्माबाद या नगर परिषदांसह बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड तालुक्यांतील ५८ गावांतील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासोबत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. निवडणुका आल्या की, बाभळी बंधाऱ्याविषयी सर्वच राजकीय पक्ष आश्वासनांचा पाऊस पाडतात़ मात्र निवडणुका झाल्या की त्याचा विसर पडतो. हे आता नवीन राहिले नाही. राज्य सरकारवर नाराजी दाखवत विकासकामे होत नसल्यामुळे सरपंच संघटनेने तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरपंच संघटनेशी चर्चा करून हा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांना तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले होते. 

तेलंगणात जाण्याचा उद्रेक होईल पालकमंत्र्यांनी मुंबईत सरपंच संघटना व जिल्ह्यातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून २५ टक्के एवढा निधी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्तास तेलंगणात जाण्याचा निर्णय थंडावला असला तरी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करणे व उघडण्याच्या तारखा बदलून घेण्याविषयी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच बंधाऱ्यात उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून बंद पडलेल्या जलसिंचन योजना चालू करणे याबाबतीत सरकार निर्णय न घेतल्यास पुन्हा या भागातील जनतेचा तेलंगणात जाण्याविषयी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शेतकऱ्यांमध्ये संतापबाभळी बंधाऱ्याविषयी महाराष्ट्र व पूर्वीच्या आंध्र प्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यात वाद निर्माण झाल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी याबाबतीत निकाल दिला; पण बंधाऱ्याचे दरवाजे उघडणे व बंद करण्याच्या तारखा या महाराष्ट्र राज्याच्या हितावह नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत असले तरी पावसाळ्यात दरवाजे उघडे ठेवायचे व पावसाळा संपल्यावर बंद करायचे़ यामुळे पावसाळ्याच्या सरतेशेवटी जमा झालेले तेही पाणी १ मार्च रोजी तेलंगणात सोडून द्यावे लागत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना बंधाऱ्याचा तीळमात्रसुद्धा उपयोग होताना दिसत नाही. तसेच राज्य सरकार बंधाऱ्याचे दरवाजे बंद करणे व उघडणे हा एककलमी कार्यक्रम राबवित आहे. अडविलेल्या पाण्याचे नियोजनही करत नसल्यामुळे राज्य सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणTelanganaतेलंगणाNandedनांदेडState Governmentराज्य सरकार