शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात; १४ दरवाजे उघडल्याने बंधारा कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:20 IST

त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला.

ठळक मुद्दे सर्वोच न्यायालयाच्या निकालाप्रमाणे धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

धर्माबाद ( नांदेड) : सर्वोच न्यायालयाच्या निकालाप्रमाणे धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर (०़५६ टीएमसी) जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला.

बाभळी बंधाऱ्याचे लोकार्पण होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहेत.  १ जुलै रोजी दरवाजे उघडावे व उपलब्ध पाणीसाठा तेलंगणात सोडण्यात यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी दिला. त्याप्रमाणे दरवर्षी ही कार्यवाही होत आहे. रविवारी सकाळी १० वाजता बंधाऱ्याचा पहिला दरवाजा उघडण्यात आला़ त्यानंतर काही वेळातच चौदाही दरवाजे उघडण्यात आले. बंधाऱ्यातील पूर्ण पाणीसाठा तेलंगणात गेला.

यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता ई.व्यंकटेश्वरलू, तेलगंणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता बी.रामाराव, आंध्र प्रदेशचे कार्यकारी अभियंता मोहनराव, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद कहाळेकर, बाभळी बंधारा उपकार्यकारी अभियंता प्रशांत पाटील करखेलीकर, उपअभियंता एस.आर.संतान, शाखा अभियंता एस.बी.पटके, शेलार, देवकांबळे, गंगाधर पाटील बाभळीकर या त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत हे चौदा दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोषणगावकर, सहसचिव जी.पी. मिसाळे, छावाचे मराठवाडा अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, कुणाल पवारे आदी उपस्थित होते.

काठोकाठ भरलेला बंधारा कोरडाठाक झालाबंधारा पाण्याने काठोकाठ भरला होता. ते जमा झालेले पूर्ण पाणी तेलगंणात गेले. यंदा पाऊस  न झाल्यास बंधारा कोरडाच राहणार आहे़ शासनाने याबाबतीत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. तत्पूर्वी उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग करण्यासाठी बंद पडलेल्या जलसिंचन योजना चालू कराव्यात अथवा नवीन जलसिंचन योजना राबविण्यात यावी़ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाभळी बंधारा कृती समितीने केली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीTelanganaतेलंगणाNandedनांदेड