शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कुस्त्यांची दंगल रणरागिणींनी गाजवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:37 AM

शहरातील जि.प.मुलांचे हायस्कूल, कंधार. मैदानावर जंगी कुस्त्याची दंगल रंगली. नामवंत मल्लांचा सहभाग होता.परंतु, मुलीच्या सहभागाने कुस्तीप्रेमींनी रणरागिणीच्या धाडस, चिवट, चपळाई, झुंज, डावपेचांना भरभरून दाद दिली. रणरागिणींनी कुस्ती दंगल गाजवली असेच एकंदरीत चित्र होते.

कंधार : शहरातील जि.प.मुलांचे हायस्कूल, कंधार. मैदानावर जंगी कुस्त्याची दंगल रंगली. नामवंत मल्लांचा सहभाग होता.परंतु, मुलीच्या सहभागाने कुस्तीप्रेमींनी रणरागिणीच्या धाडस, चिवट, चपळाई, झुंज, डावपेचांना भरभरून दाद दिली. रणरागिणींनी कुस्ती दंगल गाजवली असेच एकंदरीत चित्र होते.शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला भाग कुस्तीप्रेमीच्या गर्दीने फुलून गेला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती दंगल लक्षवेधी ठरली. पहिल्यांदाच शहरात पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत मुलींनी सहभाग घेत विक्रम केला. महिमा राठोड (पुसद), पायल बनसोडे (लातूर), पूजा बनसोडे, आदिती सगर, धनश्री तळेकर, दिव्या वाघमारे या मुलींचा सहभाग नवीन मल्लांना प्रेरणादायी ठरला. पूजा बनसोडे व ओमकार केंद्रे या लढतीचा आखाड्यातील प्रेक्षकांनी आनंद घेतला. मुलीच्या कुस्त्याची दंगल पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते अ‍ॅड.मुक्तेश्वर धोंडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे ज्येष्ठ नेते चन्नावार, जि.प.सदस्य दशरथ लोहबंदे, जि.प. सदस्या प्रा.डॉ. संध्या धोंडगे, पं.स.सभापती सत्यभामा देवकांबळे, नगरसेविका वर्षा कुंटेवार, नगरसेवक अ.मन्नान चौधरी, शहाजी नळगे, विनोद पापीनवार, सुधाकर कांबळे, उपसभापती भीमराव जायभाये, पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, गणेश कुंटेवार, सत्यनारायण मानसपुरे, बाबाराव पा.शिंदे, आबासाहेब नाईक, पंडित देवकांबळे, पंडीत पा.पेठकर, सरपंच माधवराव पेठकर, उपसरपंच उत्तम भांगे, गुरूनाथ पेठकर, सुधाकर कौसल्ये, स्वप्निल गारोळे आदींची उपस्थिती होती.अखेरची कुस्ती योगेश मुंडकर व अच्युत टरके यांच्यात झाली. परंतु, ही तुल्यबळ लढत बरोबरीत सोडण्यात आली. तसेच दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती परमेश्वर जगताप व अफजल यांचीही बरोबरीत सुटली. पंच म्हणून प्रा. शिवराज चिवडे, प्रा. डॉ. गंगाधर तोगरे, बी. डी. जाधव, हणमंत शेंडगे, संभाजी मुंडे, वामन नागरगोजे, गीते, जाधव यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी शिवसेना कंधार ता. प्रमुख माधव मुसळे, लोहा ता. प्रमुख संजय ढाले आदींनी परिश्रम घेतले. दिवसरात्र विद्युतझोतात खेळविलेल्या कुस्तीच्या दंगलीना कुस्तीप्रेमीची मोठी उपस्थिती होती.

 

टॅग्स :NandedनांदेडWrestlingकुस्तीWomenमहिला