शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलातील पाणी हवंय ? चहा, नाश्त्याची आॅर्डर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:24 IST

वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मांडवी भागात दोन भांडे पाण्यासाठी रात्रीचा जागर

विश्वास कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी : वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़नळयोजना नसलेल्या कोठारी, नागापूर, लिंगी, निराळा, भिलगाव, जरूर खेडी या गावांचा पाणीप्रश्न दिवसागणिक बिकट बनत आहे़ संभाव्य पाणी बळी टाळण्यासाठी या प्रस्तुत गावांत पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे़ तर राज्यपाल दत्तकगाव जावरला व घाटमाथ्यावरील मोहाडा येथील टँकरचा मंजूर प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे़ सध्या या भागातील परसराम ना़ तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ कडक उन्हाळा दोन महिने बाकी आहे़ ठिकठिकाणचा पाणीप्रश्न तातडीने हाताळला नाही तर पाण्यासाठी मांडवी भागात सर्वत्र हाहाकार उडण्याची शक्यता आहे.अधिक मासात रखरखणारे ऊन अधिकाधिक वाढत आहे़ अशात पळशी, रामजी ना़ तांडा, लिमगुडा, सिंगोडा, रायपूर तांडा, पळशी तांडा, उमरी बा़, सुभाषनगर, गणेशपूर, सिरपूर, मांडवी, कनकी, लक्ष्मीनगर आदी लोकवस्तीच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने भेडसावत आहे़ कर्मचारी वर्गांनी कुटुंब गावाकडे स्थलांतरित केले आहे़कमी पावसाचा फटकायंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदी-नाले धो-धो वाहिले नाही़ सिरपूर, मांडवी, दरसांगवी, भिलगाव हे बृहद लघुप्रकल्प काठोकाठ भरले नाहीत़ आजमितीस हे प्रकल्प कोरडे पडल्यात जमा आहे़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर गेली़ ५०० फूट बोअर करूनही पाणी लागत नाही़ गावशिवारात जुन्या काळातील ज्या एक-दोन विहिरी आहेत, तेथेच दिवसरात्र पाण्यासाठी झुंबड हे चित्र पहावयास मिळत आहे़कोरड्या विहिरी खोल करून आडवे बोअर मारले़ त्यातून पाण्याचा निचरा होवून नागरिकांना पाणी मिळू लागले आहे़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा प्रयोग चालू केला - सय्यद, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, किनवटज्या गावात नळयोजना नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करुन पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे- रेणुका जितेंद्र कांबळे, पं़स़ सदस्या़आठवडी बाजारातील सौरऊर्जेवरील नळयोजना पूर्ववत सुरू करण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यात येईल -पी़एम़आडे, ग्रामसेवक़घरपोच पाणी ही सवय झालेल्या मंडळीची मात्र चांगलीच कोंडी होत आहे़ २०० रुपये मोजून बैलगाडीद्वारे येणारे पाणी आठवड्यात एकदा मिळत आहे़ या २०० लिटर पाण्यात गुजराण करणे खूप जिकिरीचे बनले आहे़ शेत शिवारातील ६० ते ७० फूट खोल विहिरीत तळाशी असलेल्या पाणी बादली भरून काढताना कसरत करावी लागत आहे़ जुनी-जाणती मंडळी भूतकाळातील पाणी व्यवस्था यावर भाष्य करीत आहेत. नवख्यांची मात्र फटफजिती होत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईhotelहॉटेल