शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलवर मत नोंदविले; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:29 IST

व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अ‍ॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेड : व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अ‍ॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून निवडणूक विभागाने विविध आचारसंहिता पथके तसेच भरारी पथके स्थापन केली आहेत. १९ मार्च रोजी सी-व्हीजील अ‍ॅपद्वारे नांदेड दक्षिणच्या आचारसंहिता पथकाकडे व्हॉटस्अ‍ॅपद्वारे एक्झीट पोल सांगितला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. भरारी पथक क्र. ३ ने गोपाळचावडी येथील माजी सरपंच साहेबराव पाटील सेलूकर यांच्याकडील फोन चेक केला. सेलूकर यांनी त्यांच्या व्हॉटस अ‍ॅपवर असलेल्या बळीरामपूर ग्रूपवर एक्झीट पोलवर आपले मत नोंदवले होते. ही बाब त्यांनीही चौकशीत मान्य केली. या सर्व प्रकरणाचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले. त्यात सेलूकर यांनी आचारसंहिता भंग केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पथकाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारी