शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अत्यंत दुःखद! सेवानिवृत्तीला १२ दिवस शिल्लक असतानाच जवानाची प्राणज्योत मालवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:43 IST

सेवानिवृत्तीला १२ दिवस बाकी असतानाच जवानाची मृत्यूशी झुंज अपयशी

भोकर (नांदेड): १८ वर्षे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एका बहादूर जवानाचा सेवानिवृत्तीचा आनंद साजरा करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भोकर येथील शहीद प्रफुल्लनगरचे रहिवासी असलेले जवान सुधाकर श्रीराम कदम (वय ३७) यांची १९ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण भोकर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच 'काळाचा घाला'सुधाकर कदम हे २००८ मध्ये ईएमई बटालियन अंतर्गत २ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये 'नायक' पदावर भरती झाले होते. त्यांनी आपल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पंजाब, जम्मू-काश्मीर, आसाम, राजस्थान आणि श्रीनगर यांसारख्या अतिसंवेदनशील भागात देशसेवा बजावली. विशेष म्हणजे, अवघ्या १२ दिवसांनंतर म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी ते निवृत्त होऊन कायमचे घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

लोकशाहीचा हक्क बजावला अन् तब्येत बिघडलीकाही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सुधाकर कदम २ डिसेंबर रोजी खास रजेवर गावी आले होते. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कारजवान सुधाकर कदम यांचे पार्थिव आज (१९ डिसेंबर) सायंकाळी भोकर येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भोकर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Soldier dies 12 days before retirement after 18 years.

Web Summary : Soldier Sudhakar Kadam, 37, from Bhokar, passed away in Pune just before retirement after serving 18 years. He served in sensitive areas. He recently voted in local elections and then fell ill. Funeral with state honors will be held in Bhokar.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNandedनांदेड