शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांचे व्यवहारबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:38 IST

प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले, शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यामुळे प्लास्टिक विक्री करणाºयांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ नांदेडात आजघडीला प्लास्टिकचे सात कारखाने आहेत़ तर प्लास्टिक विक्री करणारी नांदेड शहरात मोठी २२ दुकाने आहेत़ तर त्यांच्याकडून माल खरेदी करुन किरकोळ विक्री करणाºयांची संख्या जवळपास अडीचशेच्या घरात आहे़प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे या सर्वांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, प्लास्टिकबंदी निर्णयाच्या विरोधात नांदेडात गेल्या पाच दिवसांपासून विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले असल्याची माहिती आहे. शिष्टमंडळात ललीत तापडीया, मानधनी, कपिल परवाल, अलीम, संजय पटवारी, राजेश्वर प्लास्टिक यांच्यासह अनेक व्यापाºयांचा समावेश होता़ दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि महापौरांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे़जिल्हाधिकारी, महापौर यांची आज घेणार भेटप्लास्टिकसंदर्भात गुरुवारी संघटनेचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि महापौर यांची भेट घेणार असून विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे़दरम्यान, मागील पाच दिवसांपासून व्यापाºयांनी शहरातील दुकाने बंद ठेवली आहेत.प्लास्टिक बंदीचा फटकाशासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यामुळे प्लास्टिक विक्री करणाºयांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कारखानदारांसह विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAshok Chavanअशोक चव्हाण