शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

८ लाख ४४ हजार बालकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:03 IST

२७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ८ लाख ४४ हजार ३४६ बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून उद्दिष्टाच्या ९१.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी मोहिमेअंतर्गतच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असून त्यानंतरही वंचित राहणाऱ्या बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमातून ही लस घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देगोवर, रुबेला मोहीम : जिल्ह्यात ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण

नांदेड : २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ८ लाख ४४ हजार ३४६ बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून उद्दिष्टाच्या ९१.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी मोहिमेअंतर्गतच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असून त्यानंतरही वंचित राहणाऱ्या बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमातून ही लस घ्यावी लागणार आहे.गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवरमुळे दरवर्षी देशात ५० हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात. तर रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदरमातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृदयविकृती होऊ शकते. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या वतीने गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी अंतर्गतच्या यंत्रणेला ६ लाख ६ हजार ४९७ लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ लाख ६१ हजार ४४३ म्हणजेच उद्दिष्टाच्या ९२.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले. ४५ हजार ५४ बालकांच्या लसीकरणासाठी यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना १ लाख २० हजार ७३७ लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ६८५ बालकांना लसीकरण करण्यात आले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा १३.२१ टक्के अधिक बालकांचे लसीकरण करण्यात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा यशस्वी ठरली. तर नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीसाठी १ लाख ९७ हजार ८४० बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ४६ हजार २८१ बालकांना लसीकरण करण्यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. महानगरपालिकेने उद्दिष्टाच्या ७३.९१ टक्के लसीकरण पूर्ण केले असून नांदेड शहरातील ५१ हजार ६२२ बालकांचे लसीकरण अद्यापही करावयाचे शिल्लक आहे.दरम्यान, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मोहिमेला चांगले यश मिळाले आहे. राज्यात सर्वाधिक लसीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात झाले. उद्दिष्टांहून अधिक म्हणजे ११३ टक्के लसीकरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यात ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ९६ टक्के लसीकरण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९४ तर परभणी जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरण झाले असून बीड जिल्ह्यात ८७ तर जालना जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ८१ टक्के लसीकरण करण्यात यंत्रणेला यश आले.मोहिमेअंतर्गत लसीकरणाची आज शेवटची संधीनांदेड महानगरपालिकेतंर्गतची ५१ हजार ६२२ बालके अद्यापही गोवर, रुबेला लसीकरणापासून दूर आहेत. तर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील एकूण ८० हजार ७२८ बालकांचे लसीकरण करावयाचे आहे. या सर्वांसाठी मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याची अखेरची संधी शनिवारपर्यंत उपलब्ध आहे. ज्या बालकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, अशा बालकांना शनिवारी संबंधित ठिकाणच्या केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारनंतरही जी बालके लसीकरणाविना राहतील त्यांना नियमित लसीकरण केंद्रातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

गोवर हा प्राणघातक तसेच संसर्गजन्य रोग आहे. बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी हा रोग असल्याने शासनाने व्यापक मोहीम राबवून बालकांचे लसीकरण केले. मोहिमेदरम्यान काही अफवा पसरल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत वेळीच जनजागृती मोहीम राबविल्याने आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला चांगले यश मिळाले. जिल्ह्यातील ८० हजार बालके अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. त्यांनी शनिवारनंतर नियमित लसीकरण केंद्रात जावून बालकांचे लसीकरण करुन घ्यावे.- डॉ. व्ही. आर. मेकाणेजिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य