शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

देगलुरात अभूतपूर्व शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:57 IST

शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़

ठळक मुद्देशिवजन्मोत्सव सोहळा चौकाचौकांत पथनाट्य सादरशिवकालीन देखाव्यांनी लक्ष वेधले

देगलूर : शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामूहिक जिजाऊवंदना पार पडली. आ. सुभाष साबणे, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी आ़ रावसाहेब अंतापूरकर, शिवजन्मोत्सव समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश देशाई देगावकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मोत्सव शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी शहरातील रस्ते सुशोभित करण्यात आले होते. रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. ज्ञानप्रभा कन्या शाळा, प्रगती माध्यमिक विद्यालय सुगाव, प. पू. गोळवलकर विद्यालय, साधना प्राथमिक शाळा, महात्मा फुले इंग्रजी विद्यालय आदि शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, अनिष्ठ प्रथा, मतदार जागृती अभियान, शिवकालीन प्रसंग, आदि विषयांवर शहरातील प्रमुख चौकांत पथनाट्य सादर केले.उन्हाच्या तीव्रतेत शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जय जिजाऊ, जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. शोभायात्रेत जुन्नर येथील ढोल-ताशांचे पथक लक्षणीय होते. घोड्यावर जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांची वेषभूषा केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी अश्वारुढ झाले होते. याशिवाय रथ, तोफ, तुतारी, उंट, भजनी मंडळ, आदिवासी नृत्य व लेझीम पथकाने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.शोभायात्रेत आ. सुभाष साबणे, माजी आ़रावसाहेब अंतापूरकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, अंकुश देशाई देगावकर, संभाजीराव मंडगीकर, रमेश देशमुख शिळवणीकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जि़ प़ सदस्या डॉ़ मीनल पाटील खतगावकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, महेश पाटील, अवधूत भारती, लक्ष्मीकांत पद्मवार, बालाजी रोयलावार, तुळशीराम संगमवार, अविनाश निलमवार, धोंडिबा कांबळे, सुजित कांबळे, अशोक गंदपवार, शत्रुघ्न वाघमारे, डॉ विनायक मुंडे, डॉ़सदावर्ते, डॉ. गुंडेराव गायकवाड, विक्रम साबणे, महेमूद, प्रशांत दासरवाड, श्याम पाटील कुशावाडीकर, मीरा मोहियोद्दीन, शंकर पाटील मैलापुरे, व्यंकट पाटील सुगावकर, व्यंकट पुरमवार, अनिल तोताडे, नितेश पाटील, भगवान जाधव, बाबू मिनकीकर, चंद्रकांत मोरे, विकी शिंदे, निखिल कोठारे, जनार्दन बिरादार, शिवा डाकोरे आदी उपस्थित होते.कंधार शहरात भव्य मिरवणूककंधार : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शहरात सकाळी शिवअभिषेक श्री गुरू महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मोटार सायकल रॅली व भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांचा फेट्यांसह सजीव देखावे लक्षवेधी ठरत होते. सजीव देखाव्यात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ सहभागी झाले होते. मिरवणुकीत आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, जि़ प़ सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, संजय भोसीकर, शिवसेना नेते अ‍ॅड.मुक्तेश्वर धोंडगे, जि.प.सदस्या प्रा. डॉ.संध्याताई धोंडगे, प्रा.चित्राताई लुंगारे, परमेश्वर पा. जाधव, संभाजी पा.लाडेकर, धनराज लूंगारे, बळीराम पवार, नामदेव कुटे, व्यंकट गव्हाणे, आत्माराम पा.लाडेकर, प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे, सचिन जाधव, पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, अ‍ॅड.गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर डांगे, नगरसेवक शहाजी नळगे, सुनील कांबळे आदीसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तरूण, स्त्री-पुरूष सहभागी होते. उशिरापर्यंत मिरवणूक चालू होती. पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :NandedनांदेडShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज