शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ नावारुपाला आणल्याचे समाधान; निवृत्तीनंतर लेखन, संशोधनात रमणार : पंडीत विद्यासागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:20 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले.

- विशाल सोनटक्केनांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले. या माध्यमातून हे विद्यापीठ इतर विद्यापीठाच्या बरोबरीत आणल्याचे समाधान आहे, अशा भावना मावळते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केल्या. निवृत्तीनंतर पुण्यामध्ये संशोधन, लेखनात रमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदभार हाती घेतल्यानंतर अनेक आव्हाने होती. मात्र विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात भरीव योगदानास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाद्वारे अर्थसहाय्य करीत आहे. यासाठी नॅकचा ‘अ’ दर्जा असण्याची अट आहे. स्वारातीम विद्यापीठ या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरल्याने विद्यापीठाला भरीव सहाय्य मिळत आहे. ग्रंथालयाने आता पीएच.डीचे सर्व प्रबंध डिजीटल उपलब्ध करुन दिले आहेत. संशोधनामध्येही विद्यापीठ चांगली कामगिरी करीत आहे. नुकतेच विद्यापीठाने मुतखड्यावरील प्रभावी औषध बाजारपेठेत आणले आहे. या औषधाला केंद्र शासनाचे पेटंटही मिळाले आहे.

या संशोधनासाठी अनुदान देणाऱ्या रूसाच्या दुसऱ्या टप्प्यात १० कोटी प्राप्त झाले आहे. त्यामध्ये सोलार एनर्जी प्रकल्प  उभारण्यात येईल. याबरोबरच पुढील दहा वर्षासाठी विद्यापीठाने ८५४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यास पूर्ण क्षमतेने नांदेडचे विद्यापीठ विकसित झालेले दिसेल, असा विश्वासही डॉ. पंडीत यांनी व्यक्त केला. 

आॅनलाईन प्रश्नपत्रिकांची योजना राबविणारे पहिलेच विद्यापीठविद्यापीठाच्यावतीने परीक्षा घेणे, त्यासाठी नियोजन करणे हा महत्वाचा भाग असतो. या परीक्षेसाठी धाडसाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि प्रश्नपत्रिका आॅनलाईन पाठविण्याची योजना कार्यान्वित केली. या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका छापणे आणि वितरीत करणे याचा लाखोंचा खर्च वाचला. विद्यापीठातील सर्व विषयांसाठी ही योजना राबविणारे स्वारातीम हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ असल्याचेही विद्यासागर यांनी आवर्जून नमुद केले.  

डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे विद्यापीठाचा प्रभारकुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर शुक्रवार ३१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन कुलगुरू येईपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदभार आयुर्वेदिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. डॉ. म्हैसेकर हे मुळचे नांदेड येथीलच असून नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, अधिष्ठाता आदी पदावर त्यांनी सुमारे २५ वर्षाहून अधिक काळ काम केलेले आहे. या संदर्भात डॉ. म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता शुक्रवारीच आपण पदभार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षण