शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:49 IST

शहरातील बाजारपेठेतून दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी पकडले आहे़ अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या तीन दुचाकी व पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

नांदेड : शहरातील बाजारपेठेतून दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी पकडले आहे़ अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या तीन दुचाकी व पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोघांची रवानगी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.शहर व परिसरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत़ मुख्य बाजारपेठ आणि घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करीत आहेत़ त्यामुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.इतवारा ठाण्याच्या हद्दीत काही चोरटे दडून बसल्याची माहिती इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती़ त्यांनी इतवारा डीबी व त्यांच्या विशेष पथकाला चोरट्यांच्या शोधासाठी पाठविले़ शुक्रवारी रात्री जुन्या नांदेड भागातून तीन चोरट्यांना पथकाने ताब्यात घेतले.त्यात प्रशांत पुयड, पांड्या व अन्य एक अल्पवयीन आरोपीचा समावेश होता. आरोपींकडून तीन दुचाकी व पाच मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पांड्या व प्रशांत पुयड या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तर अल्पवयीन आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोनि़ साहेबराव नरवाडे यांनी दिली. चौकशीअंती आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरट्यांना जेरबंद करणाºया पथकात इतवारा डीबीचे पोउपनि नंदकिशोर सोळंके, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकातील शंकर नलबे, महंमद गौस, केशव गुट्टे, कराळे, शिंदे आदींचा समावेश होता.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस