शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:48 IST

दसरा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या दांपत्य कुटुंबाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला पोलीस कर्मचारी असलेली मयताची पत्नी गंभीर जखमी झाली तर दीड वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी भोकर-किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाच्या वळणावर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर: दसरा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या दांपत्य कुटुंबाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला पोलीस कर्मचारी असलेली मयताची पत्नी गंभीर जखमी झाली तर दीड वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी भोकर-किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाच्या वळणावर घडली.हिमायतनगर तालुक्यातील भोनीतांडा येथील रहिवासी असलेले सतीश नामदेव जाधव हे उच्च शिक्षित असल्याने खाजगी शिकवणी करण्यासाठी नांदेडला राहत होते.सतीश जाधव हे बारड येथे पोलीस कर्मचारी असलेली पत्नी ज्योती आप्पाराव राठोड व दीड वर्षांची मुलगी आराध्यासह दसरा साजरा करण्यासाठी आपली दुचाकी (क्र.एम़एच़२६ ए़एच़१३१) वरुन भोकरमार्गे भोनीतांडा येथे जात असताना किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाजवळील वळणावर समोरून येत असलेल्या सिमेंटची वाहतूक करणाºया ट्रक (क्र. एम एच २६ ए़डी़२१४७) ने दुचाकीस धडक दिली. भोकर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली असून ट्रकचालक फरार झाला आहे. घटनेतील मयत सतीश जाधव हे भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पाराव राठोड यांचे जावई होत.दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले होते. जखमींना शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सतीश नामदेव जाधव (३५, रा. भोनीतांडा) यांचा मृत्यू झाला. तर महिला पोलीस ज्योती जाधव गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. तर मुलगी आराध्या येथेच उपचार घेत आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करुन टाहो फोडला होता.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात