शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा असा केला गेला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:40 IST

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन

नांदेड :

तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरचा पायी प्रवास... १५० दिवसांचा मुक्काम. राज्यपरत्वे बदलणारे हवामान, जंगल, डोंगरदऱ्या आदींचा अभ्यास करून ‘भारत जोडो’ यात्रेचा रोड मॅप बनविला आहे, तो काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी. त्यामुळेच त्यांना खासदार राहुल गांधीची टीम ‘भारत जोडो’चे आर्किटेक्ट म्हणून संबोधतात.  

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन करताना दररोजचे पायी चालत जाणारे अंतर, होणारे मुक्काम आदी बाबींचा विचार करून रोड मॅप बनविण्यात आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांनी या यात्रेचे नियोजन केले आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करत ही यात्रा देशाच्या वरच्या टोकाला असलेल्या श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकावूनच थांबेल, असा विश्वास काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कोणतीच शक्ती- आंधी या यात्रेला रोखू शकत नाही, असे ते सांगतात. 

१५० दिवसांची पदयात्राखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली असून, आजपर्यंत ६३ मुक्काम झाले आहेत. १५० दिवसांच्या पदयात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.

मराठवाडा- विदर्भाला दिले प्राधान्य भारत जोडो यात्रेचा मॅप तयार करताना महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील वाशीम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांतून ही यात्रा जात आहे. राज्यात काँग्रेसची पीछेहाट होत असताना नांदेड जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसची साथ दिली आहे. राज्यातील एकूण २८८ पैकी ४४ जागी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. त्याच मार्गाने अथवा विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा जात असल्याने निश्चितच विद्यमान आमदारांना फायदा होईल, असे मानले जात आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी