शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरातील १८ घरफोडी प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 16:45 IST

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

नांदेड : शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली घरफोडीची मालिका उघडकीस आणण्यास अखेर पोलिसांना यश आले असून या प्रकरणात दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे़ त्यांच्याकडून तब्बल ३० तोळे सोने आणि ५ दुचाकी हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़

शहरात गेल्या काही दिवसात लुटमार व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या़ या घटनांच्या तपासात स्थानिक गुन्हा शाखेचे पथके तयार करण्यात आली होती़ या पथकाने गुप्त माहितीनुसार सराईत गुन्हेगार संजय उर्फ समीर पंडित नामनूर (वय २८, रा़महबुबनगर, नांदेड) आणि सय्यद हानीफ उर्फ हनी सय्यद जाफर (वय २०, रा़महबुबनगर, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले़ त्यांची विचारपूस केली असता या दोघांनी शहरात शिवविजय कॉलनी, संभाजीरोड, कॅनॉलरोड, चैतन्यनगर, वैशालीनगर तरोडा बु़, मंत्रीनगर, दीपनगर, संकेतनगर,बेलानगर, स्वस्तिक नगर, सहयोगनगर, आनंद नगर अशा ठिकाणी मागील दोन वर्षामध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली़

तसेच ज्ञानेश्वर नगर व आनंद नगर या ठिकाणाहून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचे सांगितले़ काबरानगर व इतर ठिकाणाहून या दोघांनी दोन बुलेट, एक एफझेड, एक अ‍ॅक्टीव्हा अशा पाच दुचाकी लंपास केल्याचे सांगितले़ पोलिसांकडून घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली आहे़ या दोन आरोपीकडून १८ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षक मगर यांनी सांगितले़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिसArrestअटक