शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:49 IST

परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय १८ नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी पाणीटंचाईची समस्या भीषण

नांदेड : शहराची भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात गुरुवारी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळीही सोडण्यात आली आहे़ त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी घट झाली आहे़ परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़यंदा नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरला होता़ प्रकल्पाचे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी गोदावरीत सोडण्यात आले होते़ परतीच्या पावसात दरवर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्या जाते़ परंतु यंदा परतीच्या पावसाने दगा दिला़त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाच नाही़ त्यात गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येत आहे़ गेल्या महिनाभरात विष्णूपुरी प्रकल्पातून तब्बल २३ दलघमी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे़ गोदावरी नदीवर आजघडीला प्रशासकीय आकडेवारीनुसार अडीच हजार वीजपंपाद्वारे पाणी उपसा करण्यात येत आहे़त्यातील १ हजारावर विद्युत पंप हे अनधिकृत आहेत़ प्रकल्पातून प्रतिदिन ०़७५ दलघमी पाणीसाठा कमी होत आहे़याच वेगाने उपसा सुरु राहिल्यास फेब्रुवारीपर्यंतच विष्णूपुरी कोरडाठाक पडण्याची भिती आहे़ प्रकल्पातून होणारा हा पाणीउपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली होती़ त्यात गुुरुवारी विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळी सोडण्यात आली़३० नोव्हेंबरपर्र्यंंत हे पाणी सोडण्यात येणार आहे़ प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाळी सोडण्यात आली असली तरी, दुसरी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे़ त्यामुळे सद्यस्थितीला असलेले पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही़ या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त लहूराज माळी यांनी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ येत्या काही दिवसात नांदेडकरांवर जलसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत़पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त

  • शहरासाठी इसापूर प्रकल्पातील आधारीत सांगवी येथील बंधाºयावर पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ सांगवी बंधा-याची क्षमता तसेच पंपगृहाची क्षमता घेता उत्तर नांदेड भागातील जवळपास दोन लाख लोकांनाच या योजनेद्वारे पाणी मिळू शकते़ आता विष्णूपुरीतील पाण्याचा वेगाने उपसा होत असल्यामुळे पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त राहणार आहे़ परंतु पर्यायी पाणीपुरवठा योजनेलाही मर्यादा आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी पंचाईत होणार असल्याचे दिसत आहे़
  • विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात नांदेडला इतर ठिकाणाहून पाणी मिळण्याची शक्यताही धूसर आहे़ त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध असलेले पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ पाण्याचा दुरुपयोग टाळून नळाला तोट्या बसवाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे़
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण