शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

निसटता पराभव जिव्हारी, केवळ १ व २ मतांनी निवडून आले नांदेड जिल्ह्यात दोन उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:36 IST

काठावर पास झालेल्या नगरसेवकांच्या आनंदाला उधाण

नांदेड : जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व एक नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित झाला. काही निकाल अपेक्षित तर काही ठिकाणचे निकाल अतिशय धक्कादायक लागले आहेत. काठावर पास झालेल्या उमेदवारांचे नशीब फळफळले असून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे तर दुसरीकडे निसटता पराभव झालेल्या उमेदवारांचा स्वप्नभंग झाला असून ही हार त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

मुदखेड नगरपरिषदेत भाजपा उमेदवार प्रेमला गोपीनाथ पांचाळ या अवघ्या १ मताने निवडून आल्या असून पालिका सभागृहात जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार मोहंमद शाहिदा मो. शफी यांचा या विजयापासून केवळ १ मताने दूर राहिल्याने या जागेची केवळ मुदखेड शहरातच नव्हे तर सबंध जिल्ह्यात चर्चा होत आहे. शिवाय एक मत किती मौल्यवान असते याची प्रचितीही या निमित्ताने पहावयास मिळाली आहे. असाच काहीसा प्रकार किनवट नगरपरिषदेतही समोर आला असून प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार श्रीराम नारायणराव नेम्मानीवार हे ६३२ मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार फिरोज बाबू तवर यांना या निवडणूकीत ६३० मते मिळाली असून दोघांमध्ये केवळ २ मतांचा फरक आहे. केवळ दोन मतांनी नेमान्नीवार सभागृहात पोहोचले असून फिरोज तवर यांचा स्वप्नभंग झाला आहे. केवळ १ ते २ मतांनी झालेली हार चांगलीच चर्चेत असून हारकर जीतने वालो को बाजीगर कहते है..असे म्हणून पाठीराखे पराभूत उमेदवारांच्या दुखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

किनवट पालिकेत प्रभाग क्रमांक १ अ मध्ये भाजपाचे संतोष किशनराव मरस्कोले व उबाठाचे प्रेमदास सखाराम मेश्राम या दोघांत थेट लढत झाली. चुरशीच्या सामन्यात भाजपा उमेदवार संतोष मरस्कोले हे अवघ्या १३ मतांनी विजयी झाले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बेग नईमा बेगम या ५०८ मते घेऊन विजयी झाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खान सजित निसारखान हे पराभूत झाले. येथील उमेदवार केवळ १४ मतांनी काठावर पास झाले.

कंधार नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महंमद जफरोद्दीन हे १५ मतांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार यांना ६२५ मते मिळाली. दोघांतील तफावत अत्यल्प असल्याने या निकालाची चर्चा शहरभर झाली. सोबतच प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अपक्ष उमेदवार राजू सोनकांबळे अवघे ४ मतांचे मताधिक्य घेत विजयी झाले असून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सविता कांबळे यांचा त्यांनी पराभव केला. अवघ्या चार मतांनी कांबळे यांचा झालेला निसटता पराभव यशाला हुलकावणी देणारा ठरला.

हिमायतनगरातही काँग्रेस उमेदवार विनोद गडेवार हे केवळ १८ मतांनी विजयी झाले. तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये उबाठाचे उमेदवार मिर्झा जिशान बेग हे २० मतांनी जिंकले असून शहरात नगरपंचायतीत उबाठा गटाचे ते एकमेव सदस्य राहणार आहेत. बिलोली न.प.त प्रभाग क्रमांक १ ब मधून काँग्रेस उमेदवार खान मैमुना बेग यांनी मजपा शविआ.चे उमेदवार शेख मालनबी अहेमद यांचा १५ मतांचे मताधिक्य घेत काठावरचा विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अनुपमा महेंद्र गायकवाड या २७ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार सविता राजेंद्र कांबळे यांचा पराभव केला. या निकालाने पालिकांवर साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासक राज संपुष्टात आले असून आता लोकशाही पद्धतीने नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांची कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही व मनमानीला चाप बसणार असून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा प्रभागातच होणार आहे.

प्रचंड मताधिक्य घेत मजपाने उभारली धर्माबादेत विजयाची गुढीआक्षेप आल्याने जिल्ह्यातील धर्माबाद व मुखेड नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली. जशी निवडणूक चर्चेत आली तशी दोन्ही जागांचा निकालही तितकाच चर्चेत राहिला. धर्माबाद पालिकेत २२ पैकी १५ जागा मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. उर्वरित ७ जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या. नेतेमंडळी, लोकप्रतिनिधींनी ताकद झोकूनही येथे भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. प्रस्थापित उमेदवारांना लोळवत मजपा उमेदवारांनी मिळविलेले निर्भेळ यश विजयी व पराभूत उमेदवारांतील असलेली मतांची तफावत स्पष्ट करते. विशेष म्हणजे या नगरपरिषदेत एकही अपक्ष अथवा अन्य पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. दरम्यान, मुखेड पालिकेत भाजपाची सत्ता आली असली तरी येथील नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजयमाला देबडवार यांना जनतेने विराजमान करून राजकीय समीकरण पुरते बदलून टाकले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांची सभा येथे नगराध्यक्षपद आणू शकली नाही, अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Narrow losses sting, winners scrape through in Nanded district.

Web Summary : Nanded local elections saw nail-biting finishes. Some candidates won by single-digit margins, like 1 or 2 votes. MJP dominated Dharmabad, while Mukhed saw a surprising mayoral result despite BJP's overall victory.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Nandedनांदेड