टिप्परसाठी विवाहितेचा छळ
टिप्पर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन भगवान मोरे, नीलाबाई मोरे, रंजना मोरे, रावसाहेब मोरे, शांताबाई लाबतुरे, विजयमाला ससाणे, आकाश मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिलन डे जुगारावर धाड
नमस्कार चौक ते एमजीएम कॉलेज रस्त्यावर भेळपुरी गाड्याच्या शेजारी सुरु असलेल्या मिलन डे मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. २४ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. जुगाऱ्याकडून बाराशे रुपये जप्त करण्यात आले.
तीन हजार रुपयांची दारु पकडली
हदगाव तालुक्यातील तळेगाव पाटीजवळ अनधिकृतपणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली तीन हजार रुपयांची देशी दारु पोलिसांनी पकडली. २४ जुलै राेजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
नायगांव तालुक्यातील आंतरगाव येथे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ जुलै रोजी घडली. सुलोचनाबाई भगवान तोडे असे मयत महिलेचे नाव आहे. आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.