शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मातासाहेब गुरुद्वाराच्या सेवेदारास धमकावणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:03 IST

मुदखेड पोलिसांनी मुगट परिसरात नाकाबंदी करून किरपालसिंह आणि राजू हरजीत जाधव या दोघांना ताब्यात घेतले़

ठळक मुद्देबंदुकीसह जिवंत काडतूस आणि खंजरही जप्त

नांदेड : नांदेडपासून जवळ असलेल्या मुगट येथील श्री गुरुद्वारा मातासाहेबचे सेवेदार गुलाबसिंह पूर्णसिंह यांना धमकाविल्याच्या आरोपातून दोघांना अटक करण्यात आली आहे़ या आरोपींकडून बंदुकीसह जिवंत काडतूसे तसेच खंजर जप्त करण्यात आला आहे़ गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़

नांदेड शहरापासून जवळ असलेल्या मुगट येथील श्री गुरुद्वारा मातासाहेबचे सेवेदार गुलाबसिंह हे बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास श्री मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा तेजासिंहजी यांच्या बैठकीसमोरील प्रांगणात उभे असताना एका दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२६-ए़यु़९५२१) दोन युवक आले़ या युवकांनी सेवेदार गुलाबसिंह यांच्याकडे बाबा तेजासिंह यांच्या संदर्भात विचारपूस केली़ तसेच त्यांना बोलवा असे सांगत पिस्तुल काढून धमकावले़ दोन्ही युवकांचा हा सर्व संशयास्पद प्रकार पाहून गुलाबसिंह यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली़ पोलिसांचे नाव ऐकताच हे दोन्ही युवक घटनास्थळावरून पसार झाले.

या दरम्यान, मुदखेड पोलिसांनी मुगट परिसरात नाकाबंदी करून किरपालसिंह आणि राजू हरजीत जाधव या दोघांना ताब्यात घेतले़ या आरोपींकडून पोलिसांनी एका बंदुकीसह जिवंत काडतूसे आणि खंजरही जप्त केला़ या प्रकरणी दोन्ही युवकाविरूद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अर्धापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी एनक़े़राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़

तेजासिंह यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीघटनेची माहिती समजल्यानंतर नांदेड येथील गुरुद्वारा लंगरसाहबचे संतबाबा बलविंदरसिंहजी यांनी आपल्या सहकाºयांसह मुगट येथील गुरुद्वारास भेट देऊन अकाली बुढादलचे जत्थेदार संतबाबा तेजासिंहजी यांच्याशी चर्चा केली़ दरम्यान गुरुद्वारा मातासाहेब देवांजी गुरुद्वारा, मुगटमधील सेवादार आणि जत्थेदार तेजासिंहजी यांच्या जिवास धोका असल्याने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी शीख समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडArrestअटकPoliceपोलिस