शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

बनावट कॉल सेंटर प्रकरणात डोंबिवलीतून पकडलेल्या दोघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:50 IST

crime in Nanded नांदेड शहरातील फळ विक्रेते अब्दुल मोबीन अब्दुल माजीद बागवान यांना बजाज फायनान्सच्या नावाने फोनवरून संपर्क साधण्यात आला होता.

ठळक मुद्दे नांदेड सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेतला.

नांदेड : बजाज फायनान्सच्या नावाचा वापर करून बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांना गंडविणाऱ्या दोघांना डोंबिवलीत पकडण्यात आले हाेते. शुक्रवारी या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी अशा प्रकारे किती जणांना गंडविले, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नांदेड शहरातील फळ विक्रेते अब्दुल मोबीन अब्दुल माजीद बागवान यांना बजाज फायनान्सच्या नावाने फोनवरून संपर्क साधण्यात आला होता. तुम्हाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, त्याच्या विम्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. अब्दुल मोबीन यांनी संबंधित खात्यावर ५० हजार रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात येत होती. याबाबत अब्दुल मोबीन यांनी सुरुवातीला बजाज फायनान्सचे कार्यालय गाठले, परंतु बजाज फायनान्सने अशा प्रकारे कुणालाही फोन केला नसल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नांदेड सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेतला. या वेळी हे कॉल सेंटर कल्याण येथे असल्याचे समजले. इतवारा पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले होते. या ठिकाणाहून दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहित पांडुरंग शेरकर या दोघांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना नांदेडात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नांदेडात बजाज फायनान्सच्या नावाने या प्रकरणात ही पहिलीच तक्रार होती. या प्रकरणात पीएसआय अनिता चव्हाण यांनी तांत्रिक तपास केला.

एक कोटीची लॉटरी लागलीअन्य एका घटनेत नांदेड येथील सायबर सेलमध्ये शुक्रवारी एक तरुण आला व केबीसीची एक कोटीची लॉटरी लागली असून, संबंधित व्यक्ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २५ हजार रुपये खात्यात टाकण्याची मागणी करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. जाधव यांनी त्या तरुणाकडे आलेला संदेश आणि इतर बाबींची माहिती घेतली. हा फसवणुकीचा प्रकार असून, पैसे न पाठविण्याची सुचना त्या तरुणाला केली. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रयत्न फसला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद