शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर- हैद्राबाद महामार्गावर ट्रक-कंटेनरचा अपघात, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 14:47 IST

नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त  नागरिकांनी महामार्ग अडविला.

नांदेड -  नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त  नागरिकांनी महामार्ग अडविला. नागरिकांच्या आंदोलनामुळे तीन तासांपासून हा मार्ग ठप्प झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा बाभळीची झाडे वाढली आहेत. या झाडाच्या फांद्या रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर ) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास  नांदेडमधील ट्रक  (एम एच 26, ए डी 1918) हैद्राबादकडे जात होता. त्यावेळी हैद्राबाद येथून निघालेला कंटेनर (यूपी 72, टी 2025) नागपूरला जात होते. यावेळी बोणडरजवळ वळणावर झाडांच्या फांद्यामुळे अंदाज न आल्याने या दोन्ही वाहनांची धडक झाली. यात 4 जण जखमी झाले.

जखमींना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यामुळे तीन तासांपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. (व्हिडीओ - सचिन मोहिते)

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड