शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:11 IST

नांदेड जिल्ह्यात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ नांदेडात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनकर्त्याने तर हदगांव नगरपालिकेपुढे शिवसेना नगरसेविकेच्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती़गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करणाऱ्या आंदोलकाने मंगळवारी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलिसांनी लगेच आंदोलकाला ताब्यात घेवून रुग्णालयात दाखल केले़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती़सुनिलकुमार विठ्ठलराव धुतराज असे आंदोलनकर्त्याचे नाव आहे़ शासन मांगुर उर्फ मारुफ या माशांवर विक्रीसाठी कायमची बंदी घातली असून नांदेड जिल्ह्यात या माशांची विक्री सुरु आहे़ मांगुर माशांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी़ मत्स व्यवसाय विभागांनी मच्छीमार सहकारी संस्था यांना नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अटी व शर्ती लावलेल्या आहेत़ परंतु हे सर्व मच्छिमार सहकारी संस्था सर्व नियम धाब्यावर बसवित आहेत़ या दोन मागण्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात धुतराज यांनी आंदोलन केले होते़ त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून पुन्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते़ परंतु आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी १२ डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ मंगळवारी दुपारी धुतराज याने स्वतजवळील विषाची बाटली काढून तोंडाला लावली़ यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी लगेच धुतराज यांना ताब्यात घेवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़तर दुस-या घटनेत पिण्याचे पाणी आणि प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्यामुळे शिवसेनेच्या महिला नगरसेविकेने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हदगांव नगरपालिकेसमोर घडली़विद्या भोस्कर असे नगरसेविकेचे नाव आहे़ त्या शहरातील प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत़ प्रभागातील पाणी आणि नागरी समस्येसाठी भोस्कर यांनी अनेकवेळा मुख्याधिकारी व नगरपालिका अध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा केला़ परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्या निराश झाल्या होत्या़ ५ डिसेंबर रोजी मुख्याधिकाºयांनी प्रभागातील नागरी समस्या नमूद करताना ९ डिसेंबरपर्यंत त्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले होते़ त्याचवेळी भोस्कर यांनी समस्या सुटल्या नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ मुख्याधिकाºयांच्या आश्वासनानंतरही समस्या सुटल्याच नाहीत़ त्यामुळे भोस्कर या विषाची बाटली घेवूनच नगरपालिकेच्या आवारात आल्या होत्या़ त्याचवेळी पोनि़ प्रदीप काकडे यांनी महिला पोलिसांच्या मदतीने भोस्कर यांची समजूत घातली़ तसेच प्रशासनाला हमीपत्र लिहून देण्याची विनंती केली़ त्यावरुन प्रशासनाने प्रभागातील समस्या १४ डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे हमीपत्र लिहून दिले़ त्यानंतर भोस्कर यांनी आंदोलन मागे घेतले़

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडCrime Newsगुन्हेगारी