किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:37 AM2019-01-11T00:37:07+5:302019-01-11T00:37:56+5:30

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती.

Travelers traveled to the fort | किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

किल्ल्याकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचा खर्च होऊनही असुविधा कायम, खंदकात काटेरी झाडांची वाढ

गंगाधर तोगरे ।

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला संवर्धन, जतन व विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु २०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी आंनद लुटला. २०१७ साली ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती. ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे. विविध असुविधेमुळे हा पर्यटक घटण्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्याला १२०० वर्षाचा वैभवशाली वारसा लाभला आहे. २४ एकरवरील विस्तीर्ण किल्ला आकर्षक असा आहे. आतील-बाहेरील बुरूज, राणी महाल, दरबार महल, राजा महल, लाल महल, राजाबाग स्वारगेट, बारूदखाना, अंबरखाना, भव्य अवजड तोफ, कैदखाना आदी पाहून पर्यटक, इतिहास प्रेमी अप्रतिम वास्तूचा आनंद लुटत असतात. काळाच्या ओघात अनेक वास्तुनांं तडे गेले,कांहीचे भग्नावशेष झाले. तरीही मराठवाड्यात नाही तर राज्यात या किल्ल्याचे महत्त्व कायम नजरेत भरणारे आहे.म्हणून पर्यटकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. किल्ला विकासासाठी लोकमत गत दीड दशकापेक्षा अधिक काळापासून शासन,पुरातत्व विभाग आदीचे लक्ष वेधत आले आहे. ५ वर्षापूर्वी ३ कोटी ४० लाख ७८ हजाराचा निधी मंजूर झाला. त्यात सुरक्षा कक्ष,तिकीट घर,पर्यटक आगमन, सुविधा केंद्र, पादचारी रस्ता, प्रसाधनगृह, कारंजे पुल, फुड प्लाझा, वाहनतळ, कुंपनभिंत आदी कामाचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात कामे झाली. परंतु त्याचे उद्घाटन व वापर होण्यापूर्वीच ते जुने होण्याच्या मार्गावर आहेत.
मागील वर्षी भुईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्ती करता पावणे पाच कोटीच्या कामातून अनेक कामे झाली. चूना व वीट बांधकाम, लाकडी काम, दगडी बांधकामाने कांही वास्तुला झळाळी आली. या कामाने पर्यटकात मोठी वाढ होईल. अशा चर्चेने जोर धरला. परंतु २०१७ च्या तुलनेत घट झाली आहे.२०१७ मध्ये १लाख ३ हजार ३४५ पर्यटकांनी भेटीचा आंनद लुटला. आणि २०१८ सालात ९४ हजार ६७७ संख्या राहीली. ८ हजार ६६८ संख्या घटली. हे असे कसे झाले. यावर असुविधा विषयी तर्कवितर्क काढले जात आहेत.
किल्ल्यालगत असलेल्या खंदकात काटेरी झाडाची बेसुमार वाढ झाली आहे. त्यामुळे वास्तु सौंदर्य झाकोळले आहे. सुरक्षा बेभरोशाची असून पोलीस चौकी नाही. माहिती फलक नावालाच असून त्यावरील माहितीचा बोध होणे कठीण झाले आहे.खंदक पाण्या अभावी कोरडा आहे. मुर्ती शिल्पे उघडयावर ऊन, पावसाचे चटके सहन करत आहेत.वस्तुसंग्रहालय सोय नाही, बगीचा नाही, पिण्याचे पाणी नाही. विशेष म्हणजे गाईड नसल्याने किल्ला माहीती पर्यटकांना योग्य मिळत नाही. त्यातच कर्मचाऱ्यांची मोठी वाणवा आहे.
८ हजारांवर पर्यटकांची घट
२०१८ या वर्षात ९४ हजार ६७७ पर्यटकांनी भूईकोट किल्ल्यास भेट देवून आनंद लुटला़ २०१७ मध्ये ही संख्या १ लाख ३ हजार ३४५ होती़ ८ हजार ६६८ पर्यटकांची घट झाली आहे़ मागील वर्षी भूईकोट किल्ला संवर्धन व दुरूस्तीसाठी पावने पाच कोटीच्या कामातून अनेक कामे करण्यात आली आहेत़

Web Title: Travelers traveled to the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.