शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:57 IST

शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतांश शिक्षकांनी स्वागत केले आहे़

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रिया : १०९५ शिक्षक झाले विस्थापित, पुन्हा अर्ज करावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतांश शिक्षकांनी स्वागत केले आहे़शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार शाळांच्या पसंती क्रमांकानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी एनआयसी पुणे यांच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आली़दरम्यान, सरलच्या माध्यमातून जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध झाले़ पंचायत समिती स्तरावर शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून बदली आदेशाचे वाटप केले असून बदली झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेल्या शाळांवर रुजू होण्यासाठी सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त करण्याच्या सूचना केंद्रीय मुख्याध्यापकांना दिल्याचे नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.विनंती बदलीसाठी आॅनलाईन पद्धतीने माहिती भरलेल्या शिक्षकांची कागदपत्रे चुकीची आढळल्यास त्यांची बदली रद्द करुन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल़ तसेच बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीने नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर न झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे़ संबंधित शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर दुसºयाच दिवशी त्या शाळेतील मुख्याध्यापकांने याबाबतचा अहवाल तातडीने गटशिक्षणाधिकाºयांमार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर करावयाचा आहे.जिल्ह्यात एकूण ४ हजार ५८ शिक्षक, मुख्याध्यापक आणि पदविधर शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील ६ मुख्याध्यापक, १५ पदवीधर, १४१ सहशिक्षक, भोकर - ७ मुख्याध्यापक, २२ पदवीधर, १९२ शिक्षक, बिलोली - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, १७२ शिक्षक, देगलूर - ९ मुख्याध्यापक, १० पदवीधर, २४७ शिक्षक, धर्माबाद - ६ मुख्याध्यापक, ८ पदवीधर, १४६ शिक्षक, हदगाव - ३० मुख्याध्यापक, ३५ पदवीधर, २७७ शिक्षक, हिमायतनगर - ६ मुख्याध्यापक, ०७ पदवीधर, १२३ शिक्षक, कंधार - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, ३२९ शिक्षक, किनवट - १२ मुख्याध्यापक, ४९ पदवीधर, ३३७ शिक्षक, लोहा - १३ मुख्याध्यापक, २३ पदवीधर, ३३३ शिक्षक, माहूर - ४ मुख्याध्यापक, १० पदवीधर, ११६ शिक्षक, मुदखेड - ५ मुख्याध्यापक, २५ पदवीधर, १४७ शिक्षक, मुखेड - १७ मुख्याध्यापक, २८ पदवीधर, ३९२ शिक्षक, नायगाव - ११ मुख्याध्यापक, २० पदवीधर, २१७ शिक्षक, नांदेड - २ मुख्याध्यापक, १४ पदवीधर, १६२ शिक्षक, नांदेड मनपा शाळा - १ मुख्याध्यापक, ५ पदवीधर, ३३ शिक्षक तर उमरी तालुक्यातील ०४ मुख्याध्यापक, २४ पदवीधर, ११७ शिक्षकांच्या आॅनलाईन पद्धतीने बदल्या झाल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत़ दरम्यान, शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता़ परंतु, बदली प्रक्रियेस समर्थन करणा-या शिक्षकांनी बदली हवी टीमच्या माध्यमातून वारंवार निवेदन देवून बदली प्रक्रियेला समर्थन दर्शविले होते़---जिल्ह्यात १ हजार ९५ शिक्षक झाले विस्थापितजिल्हास्तरवरील बदली प्रक्रियेला ‘खो’ देत थेट राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या झाल्या़ यामध्ये प्रत्येक शिक्षकाला बदल्यांसाठी २० गावांची निवड करण्याचा पर्याय दिला होता़ यातून एकही गाव न मिळालेले जिल्ह्यातील १०९५ शिक्षक विस्थापित झाले आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील ९१, भोकर - ३०, बिलोली- ३१, देगलूर- १०५, धर्माबाद - १५, हदगाव - ३४, हिमायतनगर - २, कंधार - ८९, किनवट - १६, लोहा - १७८, माहूर - ८, मुदखेड - ९२, मुखेड - १४१, नायगाव - ६३, नांदेड - १५२, नांदेड महापालिका - ३२ तर उमरी तालुक्यातील १६ शिक्षकांचा समावेश आहे़ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या ते शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर तो अहवाल प्रशासनाला प्राप्त होईल़ यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर या विस्थापित शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. यासाठी ४ ते ५ दिवसांचा कालावधीही लागू शकतो. त्यामुळे हे शिक्षक सध्यातरी अधांतरी आहेत़ पर्याय दिलेल्या २० पैकी एकही गाव न मिळाल्याने सदर शिक्षकांचा हिरमोड झाला़ शिक्षक म्हणून झालेल्या रूजु झाल्यापासूनच्या ज्येष्ठतेनुसार खो- पद्धतीने गावे निवडण्याचा अधिकार शिक्षकांना दिल्याने ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना गावे मिळाली आहेत़---उर्दू माध्यमाचे ९९ शिक्षकउर्दू माध्यमाच्या शाळांमधील ९९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील एका मुख्याध्यापकांचा समावेश आहे़ तर अर्धापूर तालुक्यातील पदवीधर -१ आणि ३८ शिक्षक, भोकर - पदवीधर-२, शिक्षक-५, बिलोली- पदवीधर- १, शिक्षक-१, धर्माबाद- पदवीधर १, शिक्षक ३, हदगाव - पदवीधर- १, शिक्षक-३, हिमायतनगर - पदवीधर-१, शिक्षक-७, कंधार- १ पदवीधर- ५ शिक्षक, किनवट - १ शिक्षक, माहूर - ४ शिक्षक, मुदखेड - ३ शिक्षक, नांदेड - १ पदवीधर- ९ शिक्षक, नांदेड महापालिका शाळांतील १ पदवीधर शिक्षक आणि ९ शिक्षकांचा समावेश आहे़---४५ टक्के वेतनाची आधीच कपातआॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा पैशाचा बाजार आणि राजकीय हस्तक्षेप थांबला़ बदली झालेल्या जवळपास सर्वच शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून दुर्गम भागातील शिक्षक या प्रक्रियेवर अधिक खूश आहेत़ अशा प्रकारची बदली प्रकिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने आभार आणि अभिनंदऩ - जी़ एस़ मंगनाळे, जिल्हाध्यक्ष म़पु़प्रा़शिक्षक संघटना, नांदेड़---बदली हवी टीमकडून स्वागतरविवारी झालेल्या बदल्यांमध्ये सर्वसामान्य शिक्षकांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया रवी ढगे मुदखेडकर यांनी व्यक्त केली़ राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि सचिवांचे आभार मानले़ या निवेदनावर रवी ढगे यांच्यासह पंडित कदम, अशोक सोळंके, विजयकुमार वारले, दत्ता ढवळे, विजयकुमार कुंडलीकर, शंकर पडगीलवार, जनार्धन कदम, प्रकाश मुंगल, गोवंदे, पत्तेवार आदींच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :NandedनांदेडTeacherशिक्षकTransferबदलीNanded zpनांदेड जिल्हा परिषद