शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

आधी बदली; मग प्रमाेशन, पुन्हा बदली झाल्याने पाेलिस अधिकारी अस्वस्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 16:38 IST

काैटुंबिक अडचणी वाढणार असल्याचा सूर

राजेश निस्तानेनांदेड : राज्य पाेलिस दलात सामान्य बदल्यांची यादी लवकरच जाहीर हाेणार आहे. एकाच ठिकाणी नियुक्ती, जिल्हा व परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्यांना हलविले जाणार आहे. परंतु, त्यातील पदाेन्नतीला पात्र असलेले पाेलिस अधिकारी मात्र अस्वस्थ आहेत. कारण त्यांची आता सामान्य बदल्यांमध्ये बदली हाेईल, मग पदाेन्नती निघेल व त्या पदाेन्नतीसाेबत पुन्हा त्यांना नव्या बदलीला सामाेरे जावे लागेल. या सर्व संभाव्य फेरबदलांमुळे पाल्याचे शिक्षण व एकूणच काैटुंबिक अडचणी वाढणार असल्याचा पाेलिस अधिकाऱ्यांमधील सूर आहे. 

३१ मे ही पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची डेडलाइन आहे. एखादवेळी त्याला महिनाभर मुदतवाढही दिली जाऊ शकते. बदल्यांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना पदाेन्नती हा विषयही ऐरणीवर आला आहे. कारण पाेलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, निरीक्षक या सर्व श्रेणीतील बढत्या रखडल्या आहेत. पाेलिस निरीक्षकांना तर सर्वकाही ‘ओक्के’ असूनही गेल्या पाच महिन्यांपासून पदाेन्नतीच्या यादीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सामान्य बदलीपूर्वी या अधिकाऱ्यांची पदाेन्नती यादी जारी न झाल्यास त्यांना किमान दाेनवेळा बदलीचा सामना करावा लागणार आहे. सामान्य यादीत (जीटी) बदलीस पात्र अधिकाऱ्याची बदली हाेईल. त्यानंतर पदाेन्नतीची यादी निघाल्यास त्या पाेलिस अधिकाऱ्याला पदाेन्नतीवर नव्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. त्यामुळे त्याला आताच झालेल्या बदलीच्या ठिकाणावरून पदाेन्नतीने पुन्हा हलविले जाईल. तसे झाल्यास बदली, बढती व पुन्हा बदली याचा सामना त्या अधिकाऱ्याला करावा लागेल. त्यामुळे पाल्यांचे शाळा प्रवेश, किरायाचे घर, काैटुंबिक स्थलांतर या सर्वच बाबतीत या पाेलिस अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारचा एकूणच अस्थिर कारभार पाहता सामान्य बदल्या वेळेत हाेणार की नाही याबाबतच पाेलिस दलात साशंकतेचे वातावरण पाहायला मिळते.

मुदतवाढीसाठी अनेकांची फिल्डींगअनेक पाेलिस अधिकाऱ्यांचा जिल्हा व परिक्षेत्रातील शासन निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली हाेणार हे निश्चित आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी आहे त्या जिल्ह्यात, परिक्षेत्रात एक वर्ष मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याकरिता पाल्याचे शिक्षण, कुटुंबातील सदस्याचा आजार ही कारणे पुढे केली आहेत. काहींनी या मुदतवाढीसाठी आपल्या राजकीय व प्रशासकीय गाॅडफादरमार्फत थेट पाेलिस महासंचालक कार्यालयापर्यंत फिल्डींगही लावली आहे.

बदली-प्रमाेशन-बदली काहींच्या पथ्यावरसामान्य बदली, नंतर हाेणारे प्रमाेशन व त्यासाठी पुन्हा हाेणारी बदली ही काही पाेलिस अधिकाऱ्यांना अगदी साेयीची आहे. अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकच जिल्हा, परिक्षेत्रात आहेत. आता बदलीवर जिल्हा किंवा परिक्षेत्राबाहेर जायचे व पदाेन्नती झाली की पुन्हा साेयीचा जिल्हा व परिक्षेत्रात बदलून यायचे असाही काहींचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बदली व प्रमाेशनचा हा पॅटर्न डाेकेदुखी नव्हे तर साेयीचा ठरणार आहे. त्यादृष्टीने अनेकांनी लगतच्या परिक्षेत्रात जाऊन हात लावून परत येण्याचे नियाेजनही केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस