परभणी-मुदखेड दुहेरी मार्गावरून शनिवारपासून धावणार रेल्वे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:08 PM2020-02-12T12:08:49+5:302020-02-12T12:11:14+5:30

रेल्वे प्रवाशांसह नांदेड विभागातील अधिकाऱ्यांचे आयुक्तांच्या चाचणीकडे लक्ष लागले आहे.

Train will run from Parbhani-Mudkhed double route from Saturday! | परभणी-मुदखेड दुहेरी मार्गावरून शनिवारपासून धावणार रेल्वे !

परभणी-मुदखेड दुहेरी मार्गावरून शनिवारपासून धावणार रेल्वे !

googlenewsNext
ठळक मुद्देतीन टप्प्यांत पूर्ण झाले काम सुरक्षा आयुक्तांच्या चाचणीकडे लक्ष

नांदेड/परभणी : परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. अंतराचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, गुरुवारपासून रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. दोन दिवसांच्या चाचणीत हा मार्ग रेल्वे गाड्या धावण्यासाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र आयुक्तांकडून मिळताच  १५ फेब्रुवारीपासून हा संपूर्ण दुहेरी मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसह नांदेड विभागातील अधिकाऱ्यांचे आयुक्तांच्या चाचणीकडे लक्ष लागले आहे.

या बहुप्रतीक्षित परभणी-मुदखेड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या तीन टप्प्यांत  पूर्ण झाले़ शेवटचा टप्पा असलेल्या मिरखेल-लिंबगाव या जवळपास ३२ किलोमीटरचे सिग्नलिंग आणि रुळ आपसात जोडण्याचे काम पूर्ण होत आहे़ दमरेच्या नांदेड विभागातील सुमारे ५०० अधिकारी व कर्मचारी या कामात व्यस्त आहेत.रेल्वे विभागाने ९ ते १५ फेब्रुवारी या काळात या मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन उर्वरित कामेही पूर्ण केली आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक या मार्गाची सुरक्षा चाचणी करणार आहे. त्यात या मार्गाची तपासणी करून तो रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आहे किंवा नाही, याचा अहवाल आयुक्तांमार्फत दिला जातो. परभणी ते मुदखेड या संपूर्ण मार्गाची परत एकदा सुरक्षेच्या अनुषंगाने तपासणी होणार आहे. त्यानंतरच दुहेरीकरण मार्ग वापरासाठी खुला केला जाईल. परभणी ते मुदखेड रेल्वेमार्ग दुहेरीकरण करण्यासाठी रेल्वे बोर्डाने २०१६ मध्ये नांदेड विभागाला ३९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता़ त्यानंतर जून २०१७ पासून दुहेरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली़ 

प्रवाशांच्या वेळेची होणार बचत
नांदेड- परभणी या रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यातील अनेक प्रवासी दररोज अप-डाऊन करणारे आहेत. सध्या या मार्गावर दररोज ७० ते ८० रेल्वे गाड्या धावतात. मात्र रेल्वे क्रॉसिंग आणि इतर समस्यांमुळे हे अंतर पार करण्यासाठी अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना द्यावा लागत होता.

२८ कि.मी. अंतराचीच तपासणी शिल्लक
च्परभणी ते मुदखेड या ८१.८४ कि.मी. अंतरापैकी परभणी ते मिरखेल (१७ किलोमीटर) आणि लिमगाव ते मुदखेड (३७ कि.मी.) अशा ५४ कि.मी. अंतरावर पूर्वीपासूनच दुहेरी वाहतूक सुरू आहे. शिल्लक राहिलेल्या लिमगाव ते मिरखेल या मार्गावरील कामे पूर्ण करण्यात आली आहेत

Web Title: Train will run from Parbhani-Mudkhed double route from Saturday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.