शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...आता प्रवाशांना मोबाईलवरच मिळणार रेल्वे तिकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:30 IST

रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़

ठळक मुद्देसदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे

- श्रीनिवास भोसले

नांदेड : रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 

रेल्वे प्रवाशांना तिकिट काढण्यासाठी तिकिट खिडकी अथवा एटीव्हीएम मशीनसमोर प्रवाशांना रांगेत थांबूनच तिकिट घ्यावे लागत होते़ त्याचबरोबर स्थानकात येण्यास उशीर झाल्यास मोठ्या रांगेत उभे राहून तिकिट मिळविणे कठीण असल्याने अनेकवेळा विनातिकिट प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती़ त्यातच तिकिट निरिक्षक अथवा विशेष पथकाने तपासणी केल्यास दंड अथवा शिक्षेस सामोरे जावे लागत होते़ परंतु, स्मार्ट फोनचा वाढता वापर लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपद्वारे  कॅश आणि पेपरलेस तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानूसार रेल्वे प्रशासनाने युटीएस नावाचे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवरच तिकिट काढता येणार आहे आणि तेच तिकिट दाखवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे़ 

असे वापरा ‘युटीएस’ अ‍ॅपप्रवाशांनी अनारक्षित तिकिट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट फोनमध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे, त्यानंतर स्वत:ची माहिती त्यात आपला मोबाईल क्रमांक, नाव, जन्मतारिख, ओळखपत्र आदी माहिती भरून नोंदणी करावी लागेल़  सुरक्षितेसाठी पासवर्ड पण देता येईल़ त्यानंतर आर-वॉलेट तयार होईल़ त्यातून तिकिटाचे पैसे द्यायचे आहेत़ या आर- वॉलेटला आॅनलाईन रिचार्ज करता येईल़ शंभर रूपयांपासून ते १० हजार रूपयापर्यंतचे रिचार्जची सुविधा उपलब्ध असल्याचे वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी सांगितले़ सदर अ‍ॅप माध्यमातून १ ते चार जणांचे सर्वसाधारण तिकिट काढता येवू शकणार आहेत़ 

मोबाईल अ‍ॅपचे फायदेसदर मोबाईल अ‍ॅप दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वापरता येणार असून स्थानकापासून ५ किलोमिटरापर्यंत तसेच रेल्वेस्थानकापासून किमान १५ मिटर दूर अंतरावरून तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसाधारण, सीजन, फलाट फार्म तिकिट, द्वितीय श्रेणी तिकिट काढता येवू शकते़ परंतु, एकदा काढलेले तिकिट रद्द करता येत नाही़ त्याचबरोबर रेल्वेस्थानकापासून १५ मिटर अंतरापर्यंत सदर अ‍ॅपचा उपयोग घेवून तिकिट काढता येत नाही़ त्यामुळे किमान १५ मिटर दूर असणे गरजेचे आहे़ तिकिट तपासणीसांना वेगळे अ‍ॅप दिले असून ते त्याद्वारे तिकिट तपासणी करू शकतात़ 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेonlineऑनलाइन