शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात वाहतूक शाखाच उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:38 IST

शहरातील फुटपाथवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे पादचारी मुख्य रस्त्याचा वापर करीत आहेत़ त्याचबरोबर या दुकानासमोरच वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे़

ठळक मुद्देमहापालिका प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत

नांदेड : शहरातील फुटपाथवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे पादचारी मुख्य रस्त्याचा वापर करीत आहेत़ त्याचबरोबर या दुकानासमोरच वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे़ विशेष म्हणजे, यापूर्वीही शहर वाहतूक शाखेकडून अशाचप्रकारची मोहीम सुरु असताना मनपा प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत होते़शहरात वाहतूक कोंडीची नित्याचीच झाली आहे़ अरुंद रस्ते आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ त्यात मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यावर वाहने पार्कींगसाठी जागाच नसल्यामुळे नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात़ त्यामुळे वर्कशॉप कॉर्नर ते जुना मोंढा या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो़ या मुख्य रस्त्यावर असलेल्या फूटपाथवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे़ त्यामुळे नागरिक चालण्यासाठी मुख्य रस्त्याचाच वापर करतात़फूटपाथवरील हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून मनपाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु, प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडून या पत्राला केराची टोपली दाखविली जाते़त्यामुळे शहर वाहतूक शाखेला ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत स्वत:च अतिक्रमण हटवावे लागते़ शुक्रवारी वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद भागातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यात आले़ यावेळी विक्रेत्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले़ परंतु, कारवाईला तासभर लोटताच पुन्हा विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी दुकाने थाटली, हे विशेष!वाहतूक शाखेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मोहिमेला महापालिकेनेही प्रतिसाद देण्याची गरज आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसtraffic policeवाहतूक पोलीसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका