शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

किनवट तालुक्यात रेतीअभावी शौचालय, घरकुल कामे थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:38 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.

गोकुळ भवरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांना मोठ्या दंडाच्या रकमेला सामोरे जाण्याच्या भितीने रेतीअभावी शौचालय व घरकुलाची कामे थंडावली असल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामावर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने भर दिला आहे. तर दुसरीकडे शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले आहे. शौचालयाची एक हजाराहून अधिक व घरकुलाची ८४१ बांधकामे तालुक्यात सुरु आहेत़ मात्र बांधकामासाठी रेतीच मिळत नसल्याने बांधकाम कसे करावे याची चिंता लाभार्थ्यांना भेडसावू लागली आहे. तर योजना पूर्ण करुन घेऊ पाहणाºया अधिकारी-कर्मचाºयांची मोठी गोची झाली आहे.किनवट तालुक्यात पैनगंगानदीवर येंदापेंदा, परोटी, मारेगाव, भूलजा, किनवट, सिंदगी (मो), रामपूर, खंबाळ, माहेपूर, पांघरा, भंडारवाडी तर मलकापूर खेर्डा, चिखली खुर्द, कोठारी (चि), प्रधानसांगवी या चार नाल्यावर पंधरा रेती घाट आहेत. त्याचा लिलावच न झाल्याने रेतीचा उपसा करणे अवघड बनले आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाही रेतीचा अभावाने बांधकाम करुन घेणारे अडचणीत सापडले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन काही रेती चोरटे रात्री-अपरात्र ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध रेतीचा उपसा करुन मनमानी भावाने गरजवंतांना ती विकत आहेत.तालुक्यात १५ रेती घाट असून शासन निर्णयानुसार लिलावाकरिता देयसाठा १३ हजार १०० ब्रासचा आहे. मात्र लिलावाअभावी रेतीचा उपसा करणे कठीण बनले आहे. सराईत रेती चोर मात्र असे असतानाही चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करुन ती रेती मनमानीभावाने विक्री करुन लूट करत आहेत. या रेती घाटाचा अधिकृत लिलाव झाला असता तर गरजवंतांना कमी भावाने रेती मिळून होणारी आर्थिक लूट थांबली असती, अशी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHomeघर