आज ‘संगीत शंकर दरबार’मध्ये मिळणार निवडक दिग्गज कलाकारांच्या स्मृतींना उजाळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:41+5:302021-02-26T04:24:41+5:30

२७ फेब्रुवारी राेजी मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रम कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, ...

Today in 'Sangeet Shankar Darbar', you will find the memories of selected veteran artists ...! | आज ‘संगीत शंकर दरबार’मध्ये मिळणार निवडक दिग्गज कलाकारांच्या स्मृतींना उजाळा...!

आज ‘संगीत शंकर दरबार’मध्ये मिळणार निवडक दिग्गज कलाकारांच्या स्मृतींना उजाळा...!

Next

२७ फेब्रुवारी राेजी मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रम कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेच्या गौरवासाठी तसेच कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचा समावेश शंकर दरबारच्या पहाटेच्या कार्यक्रमात केला आहे. त्यानिमित्त आतापर्यंत घेतलेल्या कार्यक्रमाच्या उजाळामध्ये सकाळी सहा वाजता पं. हेमंत पेंडसे, सारिका आपस्तंब-पांडे, संजय जोशी, सूरमणी धनंजय जोशी, मुग्धा भट, डॉ. मृदुला दाढे-जोशी, नीलाक्षी पेंढारकर, अजित परब, नीलेश निरगुडकर यांचे कार्यक्रम पहाटेच्या सत्रात सादर होतील.

या दोन्ही सत्रातील कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, अपर्णा नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख, विश्वाधार देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी केलेल्या चित्रीकरणाचे संकलन व मिश्रण स्वरेश देशपांडे व प्रमोद देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: Today in 'Sangeet Shankar Darbar', you will find the memories of selected veteran artists ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.