शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बालशौर्य पुरस्कारप्राप्त एजाजवर मोलमजुरीची वेळ; केळीच्या गाड्या भरताना खाकीवर्दीचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:13 IST

National Child Bravery Award Winner Ejaz Nadaf : देशातील सर्व खेळाडूंना व बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे.

ठळक मुद्देनववीत असताना त्याने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एजाज नदाफला नोकरी मिळण्याची अपेक्षा

- युनूस नदाफपार्डी ( नांदेड ) : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील बालशौर्य पुरस्कारप्राप्त एजाज नदाफने बारावीत ८२ टक्के गुण संपादित करून उत्तीर्ण झाला आहे. मात्र, आजही तो घरप्रपंच चालविण्यासाठी केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो. त्याला नोकरी लागेल का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. देशातील सर्व खेळाडूंना व बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे. एजाज नदाफने कोणती तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून बारावी उत्तीर्ण झाला. ( Time of wage labor on National Child Bravery Award Winner Ejaz Nadaf) 

नववीत असताना त्याने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या. आरडाओरडा झाल्याने खेळायला जाणाऱ्या एजाजने मागचा -पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारून चारपैकी दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एजाज नदाफने केले होते. 

या शौर्याची दखल घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफला सर्व स्थरातून मान - सन्मान मिळाला. सर्वत्र सत्कार करण्यात आला. मात्र, त्यानंतर एजाज नदाफची कोणीही विचारपूस केली नाही. कोणतीही मदत मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून घरकुलाचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. आताही तो मोडक्या घरात राहात आहे. एजाज नदाफच्या हलाखाली परिस्थितीमुळे केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करतो.

आर्मी किंवा पोलीसात जाण्याची इच्छाराष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफची इच्छा पोलीस किंवा आर्मीत जाण्याची आहे. मात्र, त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला असून, केळीच्या गाड्या भरण्याचे काम करीत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेड