शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू

By श्रीनिवास भोसले | Updated: April 4, 2024 19:19 IST

नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे.

नांदेड : गाळ काढण्यासाठी ड्रेनेज चेंबर मध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नांदेड मध्ये घडली. नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे. 

खाजगी कंत्राटदारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते. या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आज गाळ काढण्याचे काम सुरू होते. ३५ वर्षीय शंकर माधव वरसवाड रा.खरबी ता.भोकर आणि २५ वर्षीय राजू मेटकर रा . माळटेकडी हे दोघे ड्रेनेज चेंबर मध्ये उतरले.  पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफड करु लागले. त्यांना वाचवन्यासाठी ३० वर्षीय गजानन पूयड रा. माळटेकडी हा देखील चेंबर मध्ये उतरला. पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले . त्यांना शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वाचवायला गेलेल्या तिसऱ्याचाही मृत्यूकेंद्र शासन पुरुस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत माळटेकडी SPS (मलउपसा केंद्र) येथे नविन मशिनरीज उभारणीसाठी खाजगी एजन्सीचे सुपरवायझर शिवरामअप्पा गंदीगुडे व २ मजुर यांनी कामास सुरुवात केली. सदरील काम करतांना २ मजुर चेंबरमध्ये उतरुन काम करत असतांना चेंबरमधील गॅसमुळे श्वास कोंडुन गुदमरल्यामुळे सदरील २ मजुर बेशुध्द पडले व त्यानंतर एक नागरिक पुयड हा त्यांचा बचाव करण्यासाठी चेंबरमध्ये उतरला असता तो पण बेशुध्द पडला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेरसंबंधीत तिघांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ बाहेर काढुन उपचारासाठी सरकारी दवाखाण्यामध्ये दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू