शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

सुटीत पोहण्याचा आनंद घेणे जीवावर बेतले; तीन बालकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 6:45 PM

यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मौजे चिखली येथील दुर्दैवी घटना

शिवणी (जि. नांदेड ) : किनवट तालुक्यातील मौजे चिखली येथील दोन बालकांचा  गावालगत असलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.  ग्रामस्थांनी बुडणाऱ्या एकाला बाहेर काढले. परंतु रुग्णालयात नेत असतानाच तिसऱ्या बालकाचाही वाटेतच मृत्यू झाला.

शिवणी परिसरातील दूर्गम भागात असलेल्या चिखली येथील गंगाधर लक्ष्मण भंडारवाड (वय १३), रितेश विठ्ठल देशट्टीवार (वय १०) आणि श्रीकर गोपाल नागूवाड (वय १४) हे तीन बालके मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी उतरले होते. दोन दिवसापूर्वीच या भागात जोरदार पाऊस आल्यामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यात या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकर नागूवाड याला ग्रामस्थांनी बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना श्रीकरचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि सुशांत किनगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे चिखली गावावर शोककळा पसरली  आहे.

पावसामुळे पाणीपातळीत वाढ सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळांना सुट्टी आहे. चिखली गावातील बहुतांश लहान मुले रिकामा वेळ असल्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये पोहण्यासाठी उतरतात. त्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाले.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे