शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरेगाव भीमा प्रकरणी नांदेड जिल्ह्यात घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:28 IST

कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शंभर टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात यावी, एस़सी़,एस़टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे व दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, एस़सी़,एस़टी अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील विद्यार्थी योगेश जाधव याच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करुन अहवाल जाहीर करण्यात यावा तसेच सरकारने २०२१ मध्ये ओबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसी, व्हीजेएनटी वर्ग-१,२,३ व एसबीसी या प्रवर्गातील समाजाची त्यात गणना करण्यात यावी, रमाई घरकुल तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची कामे तात्काळ सुरु करावीत आदी मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन दिले़यावेळी नागेश सावंत, बाळासाहेब सोनकांबळे, प्रा़ राजू सोनसळे, भीमराव बेंद्रीकर, दिलीप जोंधळे, कैलास वाघमारे, विजयकुमार कांबळे, शरद सूर्यवंशी, अशोक कापशीकर, राजू वाघमारे, सय्यद इलियास, सतीश एडके, चंद्रमनी मांजरमकर, संजय मंडेला, बाळासाहेब डोंगरगावकर, रितेश जमदाडे, प्रतीक मोरे, सोपान वाघमारे यांची उपस्थिती होती़भोकरमध्येही घंटनादभोकर : कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या घंटानादने तहसील परिसर दणाणला होता.आंदोलकांनी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घंटानाद केल्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात भीमा कोरेगाव दंगलीतील बहुजनांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शहरातील बौद्ध स्मशानभूमीतील अतिक्रमण काढून टाकावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे, १९८० पासून गायरान करणा-या शेतक-यांना कबाला द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदनावर भारिपचे तालुकाध्यक्ष भीमराव भंडारे, अध्यक्ष दशरथ भदरगे, अ‍ॅड. विजयकुमार दुधारे, मानिका जाधव, राजू दांडगे, यु.एन.एडके, राजेश चंद्रे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.लोहा तहसील कार्यालयासमोर भारिपचे आंदोलनलोहा : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी लोहा तहसील कार्यालयासमोर तीन तास घंटानाद आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले़भीमा कोरेगाव पक्ररणातील संभाजी भिडे यांना अटक करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, शेतक-यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी उपविभाीगय अधिकारी प्रभोदय मुळे व तहसीलदार डॉ़आशिषकुमार बिरादार यांना देण्यात आले़यावेळी भारिपचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ जोंधळे, अशोक सोनकांबळे, प्रमोद धूतमल, नवनाथ शेळके, सुरेश जोंधळे, नामदेव तारू, नामदेव हंकारे, जळबा मोरताटे, मोहन सोनकांबळे, राज महम्मद मन्सुरी, चंद्रकांत गायकवाड, तुकाराम दाढेल आदी उपस्थित होते़

टॅग्स :agitationआंदोलनSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव