शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही; नांदेड जिल्ह्यातील पळसवाडी तांड्याची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:51 IST

वन विभागाच्या किचकट नियमांमुळे रस्ता करण्यात अडचणी

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे प्रचंड हाल 

हदगाव (जि़ नांदेड) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली़; परंतु पळसवाडी (तांडा) या गावाला अद्याप रस्ताच नाही़ निवडणुकीच्या तोंडावर पुढारी येतात़ रस्ता होणारच अशी हमी देतात व निघून जातात़ मात्र, तीन पिढ्यांपासून गावाला रस्ताच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच आजारी पडलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी रुग्णांना हलविताना ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गटग्रामपंचायत म्हणून पळसवाडी तांडा सावरगावला जोडण्यात आला आहे़ मनाठ्यापासून ३ कि़मी़ अंतरावर हे गाव आहे़ गेली २५-३० वर्षांपासून येथील तरूण पिढी रस्त्याची मागणी करू लागली आहे़ मोठी अडचण म्हणजे वन विभागाच्या हद्दीतून हा रस्ता जातो़ त्यामुळे २० वर्षांपासून प्रयत्न करूनही काम रखडले आहे़नियमाप्रमाणे केवळ १ कि़मी़ पर्यंत १२-१५ फूट रुंद रस्ता वनविभाग देऊ शकते़ या गावातील अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा (५वी) पर्यंत संपल्यानंतर मनाठा येथे ये-जा करतात़  रस्त्यामध्ये एक मोठा नाला आहे़ पावसाळा जोरात झाला की, हा ओढा भरून वाहतो़ पाण्यातून कपडे भिजवत शाळेत जावे लागते़  गावातील रुग्णांचेही रस्त्याअभावी मोठे हाल होतात़  आठ महिने गावात डॉक्टर येतात; पण पावसाळ्यात वाहनच जात नसल्याने इकडे डॉक्टर फिरकत नाहीत़ पूर्वी बैलगाडीमध्ये आजारी व्यक्तीस आणत असत़ आता सावरगावमार्गे वाहनाने आणतात़ 

उपचाराअभावी सर्पदंश बेततो जिवावरच्रस्ता जंगलातून जात असल्याने या गावात दरवर्षी सर्पदंशाने शेतकरी दगावतात़  शेतीत काम करताना सर्पदंश झाला तर त्याला रस्त्यामुळे दवाखान्यात लवकर नेता येत नाही़ ५० कि़मी़ नांदेड व ४० कि़मी़ तालुका (हदगाव) असल्यामुळे तोपर्यंत विष रुग्णाच्या अंगात भिनते व त्याचा मृत्यू होतो़ सुशिक्षित तरुणांनी मिळून गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली़ वन विभागाचे अधिकारी येऊन गेले. मात्र, त्यानंतरही समस्या ‘जैसे थे’ आहे़. याबाबत उपसरपंच वसराम राठोड यांना विचारले असता प्रशासनाकडे विनंती अर्ज करून आम्ही आता कंटाळलो असल्याचे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNandedनांदेडStudentविद्यार्थी