शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'तिला बँकेत नोकरी करयाची होती पण...', रस्ता सोडून घरात घुसलेल्या ट्रकने तरुणीस चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:33 IST

देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी अचानक एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला.

अर्धापूर ( नांदेड ) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने घरात घुसलेल्या भरधाव ट्रकने एका २१ वर्षीय तरुणीस चिरडल्याची घटना आज सकाळी देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावरील पार्डी येथे घडली. ट्रकखाली येऊन दोन बाईकचा चुराडा झाला आहे. वर्षा माणिकराव मदने असे मृताचे नाव आहे. 

देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी अचानक एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या माणिकराव मदने यांच्या घरात घुसला. यावेळी घरात असलेली वर्षां या अपघातात गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनी साईनाथ सुरवसे, महेंद्र डांगे आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. 

हुशार आणि होतकरू तरुणीच्या मृत्यूने हळहळवर्षा ही अत्यंत हुशार आणि होतकरू तरुणी होती. ती बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. यासोबत घरी खाजगी शिकवणी घेऊन घरखर्चाला हातभार लावत असे. तिला बँकेतील नोकरीसाठी संधी उपलब्ध झाली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मृत वर्षाच्या पश्चात आई-वडील, दोन मोठ्या बहिणी व एक छोटा भाऊ असा परिवार आहे. तिच्या अपघाती मृत्यूची वार्ता गावात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड