शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

स्पर्धा परीक्षा सोडून तरुणाने माळरानात फुलविली फळबाग; देशविदेशातून मागणी, लाखोंचा नफा

By अविनाश पाईकराव | Updated: May 14, 2024 14:36 IST

तरुणाने शेतीकडे वळत दिला दहा जणांना रोजगार

नांदेड : पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करून कोरोनामुळे घरी परतलेल्या तरुणाने हताश न होता स्वत: च्या हिमतीवर काहीतरी करून दाखविण्याचा निर्धार करून वडिलोपार्जित माळरानावरील पडीक जमिनीची मशागत करून त्यात फळबाग फुलवली. आज त्याच फळबागेच्या माध्यमातून तरुणास लाखो रुपयांचा निव्वळ नफा तर मिळतोय. शिवाय आठ ते दहा बेरोजगारांच्या हाताला कामही मिळत असल्याने त्याने बेरोजगारीवर मात करून इतरांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

नंदकिशोर गायकवाड असे प्रयोगशील तरुणाचे नाव आहे. तो मूळचा भोकर तालुक्यातील भोसी या गावचा आहे. सुरुवातीला अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले. चार- पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर तेथे निभाव लागणे शक्य नसल्याने थेट गाव गाठण्याचा निर्णय त्याने घेतला अन् खचून न जाता शेती करण्याचा निर्धार या तरुणाने केला. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलोपार्जित डोंगराळ जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातील दोन एकवर त्याने उसाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात त्याला १६० टन उसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यानंतर त्याने डोंगराळ जमिनीत अंबा, जांभूळ, पेरू, फणस यासह जापान आणि थायलंडचा अंबा, उन्हाळ्यात येणारे सफरचंद, जापान, मलेशियातील पेरू, काळे आणि पांढऱ्या रंगाची जांभळं, फणस, मसाल्यासाठीचे दालचिनी, इलायची, लवंग लागवड आदी फळ पिके लागवड केली. यामध्ये त्याला यश आले असून, फळ विक्री आणि रोप विक्रीतून त्याने वर्षाकाठी ३५ लाखांचे उत्पन्न घेतले असून खर्च वजा जाता त्याला २५ लाखांचा नफा मिळाला आहे. ही फळ शेती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी गर्दी करत आहेत.

या फळ झाडांची लागवड:आंबा- १२०० (जापान, थायलंड)सीताफळ-१३०० (तीन व्हेराईटी)पेरू- ३५०० (रेड डायमंड पेरू,मलेशिया)जांभूळ- १०० (पांढरा जांभूळ, काळे जांभूळ)लिंबोनी-४०० (बारमाही)सफरचंद- ४०० (उन्हाळी)

देश-विदेशातून फळाला मागणीमागच्या तीन वर्षांपासून डोंगराळ जमिनीत सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून फळ लागवडीचा प्रयोग केला. मागच्या दोन वर्षांपासून फळाचे उत्पादन होत असून त्याला आजूबाजूच्या राज्यातून मागणी वाढली आहे. शिवाय सौदी अरब, कतारमधूनही फळाला मागणी आली आहे. यावर्षीचा माल जागेवरच विक्री झाला. पुढील वर्षी विदेशातही माल निर्यात करण्याचा मानस आहे. तरुणांनी खचून न जाता फळ शेतीकडे वळावे,-नंदकिशोर दिगंबर गायकवाड ( शेतकरी), रा. भोसी ता. भोकर. जि. नांदेड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड