शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना 

By श्रीनिवास भोसले | Updated: April 12, 2023 12:09 IST

आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते.

नांदेड : ''नाईट लँडिंग'' सुविधेसह जम्बो विमान उतरण्याची सुविधा अन् आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले नांदेडचेविमानतळ आता नावालाच उरले आहे. येथून सध्या एकही उड्डाण होत नसल्याने सदर विमानतळ असून अडचण, नसून खोळंबा, असेच काहीसे झाले आहे.

केंद्र शासनाने ''''जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान'''' योजनेत नांदेडचा समावेश करून तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जवळपास साडेचारशे कोटी रुपये खर्चून नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळाचा विस्तार आणि नूतनीकरण करण्यात आले. या ठिकाणावरून कोरोनापूर्वी नांदेड येथून मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद त्याचबरोबर दिल्ली, चंदीगड, अमृतसर या ठिकाणी विमानसेवा सुरू केली होती. परंतु मुंबईस्थित अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे एक-एक करत सर्व विमानसेवा बंद पडल्या आहेत. आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते.

काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे विमान उतरले होते. तर शेवटचे चार्टर्ड विमान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे १९ मार्च रोजी उतरले होते. प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवा कोविडमध्ये बंद झाली, त्यानंतर ती सुरूच करण्यात आली नाही. त्याचबरोबर काही दिवसांपासून नाइट लँडिगदेखील बंद झाल्याची बाब तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुढे आली.

राजकीय नेत्यांचा पाठपुरावानांदेड येथून मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, कोविडनंतर विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे नांदेडचा औद्योगिकदृष्ट्या विकासही खुंटत आहे. नांदेडला बुलेट ट्रेन येईल तेव्हा येईल. परंतु, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार असून त्यावरून सेवा मिळू शकत नाही, ही राजकीय अनास्थाच म्हणावी लागेल. सत्ताधारी भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना विमानसेवा सुरू करण्याबाबतची निवेदने दिली. परंतु, अद्यापपर्यंत एकही सेवा सुरू झाली नाही.

टॅग्स :Nandedनांदेडairplaneविमान