नांदेड: रविवारी रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुखेड तालुक्यात हाहाकार उडाला असून मध्यरात्री अनेक गावात पाणी शिरले. गावातून अनेकांना बाहेर काढण्यात आले असले तरी अद्याप दहा ते बारा जण बेपत्ता आहेत. तर शंभरहून अधिक जण गावात अडकले आहेत. प्रशासनाने आता बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचरण केले आहे.
मुखेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. लेंडी धरण क्षेत्रातील भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. गावामध्ये आठ ते नऊ फूट पाणी शिरले होते. त्यामुळं रात्रीच्या अंधारात गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
ऑटोरिक्षातील चौघे वाहून गेलेएनडीआरएफचे पथक रात्रीच मुखेड तालुक्यात दाखल झाले होते. परंतु सकाळी अकरा वाजेपर्यंत सहा गावातील शंभरहून अधिक नागरिक पाण्यात अडकले होते. हसनाल गावातील सात ते आठ जण बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु आहे. आता प्रशासनाने बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचरण केले आहे. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर धडकनाल येथून निझामबाद येथे प्रवासी घेऊन जाणार ऑटोरिक्षा नाल्याच्या पुरात वाहून गेला. यावेळी चालकाने झाडावर चढून जीव वाचवला असून ऑटोतील वाहून गेले. यात दोन महिलांचा समावेश आहे. चौघांचाही शोध सुरु आहे.