शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेचं नातं प्रेमाचं! नांदेडच्या येईलवाड कुटुंबाकडून सुनांना 'गौरी'चा मान देऊन पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:30 IST

सासू आणि सुनांच्या अनोख्या नात्यामुळे येईलवाड कुटुंब महाराष्ट्रात चर्चेत, तिन्ही सुनांना गौरी-गणपतीच्या मखरात बसवून केले पूजन.

- मारोती चिलपिपरे कंधार (नांदेड): सासू आणि सून यांच्यातील ऋणानुबंधावरच प्रत्येक घरांत सुखी संसाराचा मनोरा उभा असतो. नात्यात गोडवा असेल तर ठीक नाही तर सासू-सुनेचे पटत नाही, त्यांच्यात सदैव खटके उडतात, असे आपण अनेकदा ऐकत असतो; घरात अनेक विषयांवरून वाद सुरू असतात. प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं हे लागतंच. पण सर्वात जास्त नात्यावर चर्चा होती ती म्हणजे सासू-सुनेच्या. सासू-सून वाद हा वर्षानुवर्ष आणि परंपरागत चालू आहे. पण याला काही अपवादही असतात. असेच अपवादात्मक सासू-सुनेच्या नात्यात मायेचा गोडवा अन् सासू-सुनेचे निखळ, प्रेमळ नाते नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात मागील पाच वर्षांपासून पाहायला मिळते आहे. 

कंधारमधील येईलवाड परिवाराने आपल्या तिन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरामध्ये पारंपरिक पद्धतीने बसवत त्यांचे पूजन केले. सलग पाचव्या वर्षीही अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करीत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ‘सासू-सून’ यातील नातं अधिक दृढ होताना दिसत आहे. त्यामुळे या नात्याची ख्याती आता येईलवाड कुटुंबाच्या सोईरपणाबरोबरच महाराष्ट्रभर पोहचली आहे. या नात्याची विचारणा करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येत असल्याचे कुटुंब प्रमुख रामचंद्र येईलवाड यांनी 'लोकमतशी' बोलताना सांगितले. 

भारतात एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची मानली जाते. यामुळेच कुटुंब व्यवस्था अत्यंत भक्कम आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जर टिकवायचे असेल तर घरात सासू-सुनांची नाते स्नेहाचे राहणे गरजेचे आहे. सासू-सूनेचे भांडण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. हे नाते अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. थोड्याशा गैरसमजामुळे नाते कधी खराब होईल सांगता येत नाही. हे नाजूक नाते जपण्यासाठी फक्त सूनेने नाही तर सासूने देखील चांगले वागणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपण आधीच मनात हा समज करून ठेवतो की, सासू सूनेचे कधीच पटू शकत नाही. सासू-सुनेच्या नात्याबाबत कधी थट्टेचा विषय असतो तर कधी कटूता असते. मात्र, यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे कंधारमधील येईलवाड कुटुंबाने यंदाही पाचच्या वर्षीही मोठ्या उत्साहात चालत्या-बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सूनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे. यावेळी येईलवाड कुटुंब, तिन्ही सुनांच्या माहेरचे नातेवाईक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुलगी, सुनाच खऱ्या लक्ष्मीमाझ्या वडिलांपासूनच माझ्या घरी घट, सट, गुडी असे आदी सण साजरे केले जात नाहीत. मी शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशी यांच्यासोबत काम केलं. या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम राबविला. वंशाला दिवा देणारी सूनचं तुमच्या घरची खरी लक्ष्मी आहे हे पटवून सांगितलं. त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून केली. सून, बहिण, लेक, पत्नी या नात्यात ही चालती बोलती लक्ष्मीचा उपक्रम मागील पाच वर्षापासून माझ्या कुटुंबात चालू आहे. या आगळ्यावेगळ्या चालत्या बोलत्या सुनांचे लक्ष्मी पूजनाची समाजात हळूहळू परिवर्तन होत आहे. - रामचंद्र येईलवाड, सासरे 

आम्ही भाग्यवानआमच्या सासूबाई व सासरे आम्हा तिघींनाही प्रत्यक्ष गौरीचा मान देतात, आम्ही खरंच भाग्यवान आहोत. आम्हाला आई-वडिलांसारखी माया लावणारे सासू सासरे मिळाले. याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे वर्षा सुदर्शन येईलवाड, प्रतिभा शशिकांत येईलवाड आणि मनीषा राजकुमार येईलवाड या तिन्ही सुनांनी सांगितले.

नातं अधिक घट्ट होतेसासू-सुनेचे नाते मुलीच्या नात्यापेक्षा घट्ट होणे शक्य आहे, पण त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न, समजूतदारपणा आणि एकमेकींचा आदर करणे आवश्यक आहे. अनेकदा या नात्यात सुरुवातीला अवघडलेपण येते, पण हळूहळू एकमेकींना समजून घेतल्यास आणि एकमेकींच्या गरजा व भावनांचा आदर केल्यास हे नातं अधिक दृढ होऊ शकतं.- कमलबाई रामचंद्र येईलवाड, सासू 

टॅग्स :NandedनांदेडFamilyपरिवार