शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणींच्या घरी आलेले पत्र खोटे; शेतीच्या वादातून शिक्षकाला गोवण्यासाठी वृद्धाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 18:16 IST

Sanjay Biyani Murder: शिक्षकाला केले वाळू माफिया, धर्माबाद तालुक्यातून आरोपीला केली अटक

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांच्या हत्येचा कट परभणीत शिजल्याच्या आशयाचे निनावी पत्र बियाणींच्या घरी धडकल्याने पोलिस चक्रावून गेले होते. या प्रकरणात तपासानंतर शेतीच्या वादातून एका शिक्षकाला या हत्येत अडकविण्यासाठी वृद्धाने पोलिसांची दिशाभूल करत हे पत्र पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ७१ वर्षीय वृद्धाला अटक केली आहे.

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी भर दिवसा त्यांच्या घरासमोर दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरु आहे. परंतु सोमवारी दुपारी स्पीड पोस्टने बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले. बियाणी कुटुंबियांनी हे पत्र एसआयटीकडे दिले. त्यात आनंदगरचा दादा पांडूरंग येवले हा असून तो परभणीला आला होता. परभणीतच बियाणी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. आटाळाचा रेती माफिया आहे, परभणीत कोणी बांधकाम व्यावसायिक राहू नये यासाठी बियाणीला ठाेकले अशी मोडक्या-तोडक्या शब्दातील हिंदी भाषा होती. 

या पत्रामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. परंतु केवळ तपास भरकटविण्यासाठी किंवा वैयक्तीक वादातून काटा काढण्यासाठी हा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांना आला होता. उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी वेगाने सूत्रे हलविली. त्यानंतर धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथून विठ्ठल संतराम सूर्यवंशी (७१) या वृद्धाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपीचा येवले सोबत शेतीचा वादआरोपी विठ्ठल सूर्यवंशी आणि पांडूरंग येवले यांच्यात गेल्या काही वर्षापासून शेतीचा वाद होता. बियाणींची हत्या झाल्यानंतर या खूनात येवले यांना अडकविण्यासाठी सूर्यवंशी यानेच ते पत्र पाठविली होती. त्यासाठी तो परभणीला गेला होता. या ठिकाणाहून स्पीड पोस्टने निनावी पत्र बियाणी यांच्या घरी पाठविले. विशेष म्हणजे येवले हे शिक्षक असताना त्यांना रेती माफिया असा उल्लेख आरोपीने पत्रात केला होता.

आटाळा नावावरुन लागले धागेदाेरेआरोपी सूर्यवंशी याने येवले हा आटाळाचा रेती माफिया असल्याचे पत्रात नमूद केले होते. पोलिसांनी आटाळा गाव गाठून येवले यांची माहिती घेतली. त्यात सूर्यवंशी याच्यासोबत शेतीचा वाद असल्याचे पुढे आला. सूर्यवंशीच्या मागील काही दिवसाच्या हालचालीची माहिती घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीArrestअटक