शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या मजुराचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2023 19:49 IST

वसरणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या शेजारील नाल्याला अतिवृष्टीने पूर आला होता

नांदेड: नांदेड ते लातूर मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाट्याहून वसरणीकडे जाणाऱ्या नाल्यामधील पाण्यात गुरुवारी रात्री एक ३६ वर्षीय मजूर वाहून गेला होता. आज सकाळी मजुराचा मृतदेह आढळून आला. विठ्ठल रामचंद्र कापावार असे मृत मजुराचे नाव आहे.

नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील एनडी-३१, 'हडको' परिसरातील रहिवासी तथा मजूरीचे काम करून आपली उपजीविका भागविणारे विठ्ठल रामचंद्र कापावार हे २७ जुलै रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेचेदरम्यान, डॉ. आंबेडकर चौक (लातूर फाटा) परिसरातून  घराकडे जात होते. दरम्यान, वसरणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या शेजारील नाल्याला अतिवृष्टीने आलेल्या पुराच्या पाण्यात विठ्ठल काचावार वाहून गेले. 

ही बाब लक्षात येताच नांदेड ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. आज सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, सपोउपनि. शेषराव शिंदे तसेच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोद्दीन आदी कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. काही वेळाने नाल्यात विठ्ठल रामचंद्र कापावार यांचा मृतदेह सापडला. अतिवृष्टीने नाल्याला आलेल्या पुराचे पाण्यात वाहून जावून विठ्ठल कापावार यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल नांदेडच्या 'सिडको व हडको' परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडRainपाऊस